मोदक आणि वडापाव आता पोस्टाच्या तिकिटावर

05 Nov 2017 08:18 PM

महाराष्ट्राची ओळख असलेले दोन पदार्थ, मोदक आणि वडापाव पोस्टाच्या तिकीटांवरही येणार आहे. भारतीय पोस्ट खात्यानं प्रदर्शित केलेल्या भारतातील 24 खाद्यपदार्थांच्या पोस्ट तिकीटांमध्ये  महाराष्ट्रातील मोदक आणि वडापाव पदार्थांना स्थान दिलं. भारतीय पोस्ट खाते डिजिटल युगात जरी मागे पडत चालले असले तरी या खात्याचे काही उपक्रम सर्वांचेच लक्ष वेधून घेत असतात. भारतीय पोस्ट खाते दर वर्षी नवनवीन पोस्टाची तिकीटे प्रदर्शित करत असते. या पोस्टाच्या तिकीटावर भारतीय संस्कृतीची झलक आपल्याला पहायला मिळते. मोदक हा गणेश उत्सवात महाराष्ट्रातील प्रत्येक घरात केला जातो. त्याचबरोबर वडापाव हा मुंबईतील सर्वात जास्त खाल्ला जाणारा पदार्थ आहे. 

LATEST VIDEOS

LiveTV