वाराणसी : अभिनेते अतुल कुलखर्णींचा सिगारेटसोबतचा फोटो व्हायरल

09 Dec 2017 10:27 PM


मराठी चित्रपटसृष्टीतील मि. परफेक्शनिस्ट म्हणून प्रसिद्ध असलेला अभिनेता अतुल कुलकर्णी सध्या वाराणसी येथे एका चित्रपटाचे शुटिंग करतोय. तिथले शुटिंग दरम्यानचे काही फोटो त्याने फेसबुक अकाऊंटवरही शेअर केले.
अतुलने वाराणसीतील नदीच्या काठाजवळ काढलेला त्याचा एक फोटो नुकताच शेअर केला. पण, या फोटोपेक्षा कॅप्शननेच सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय.
अतुलने लिहिलं की, ‘ वाराणसी शूट !! पल्याडचा किनारा …. हा सीनमधला फोटो आहे. Interesting वाटला म्हणून टाकलाय. धुम्रपान आरोग्यास हानीकारक आहे हे मला १०० टक्के मान्य आहे. मी स्वतः ते करत नाही आणि प्रोत्साहित पण करत नाही. मला माफ करा पण यानंतरही धुम्रपानाविषयी कमेंट्स आल्या तर त्या डिलिट होतील.’

LATEST VIDEOS

LiveTV