कोल्हापूर : नाभिक समाजाबद्दलच्या विधानाबद्दल मुख्यमंत्र्यांकडून पुन्हा एकदा दिलगिरी

25 Nov 2017 01:06 PM

नाभिक समाजाबद्दल केलेल्या आक्षेपार्ह विधानाबाबत मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा दिलगिरी व्यक्त केली आहे. काल (शुक्रवार) कोल्हापुरातल्या वारणामध्ये ‘मुख्यमंत्री दिलखुलास’ हा कार्यक्रम झाला. त्यावेळी बोलताना त्यांनी दिलगिरी व्यक्त केली.

या कार्यक्रमात वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांनी मुख्यमंत्र्यांना आपले प्रश्न विचारले. यावेळी नाभिक समाजाच्या विधानाबाबत विचारलं असता आपला कुणालाही दुखवण्याचा हेतू नव्हता. असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी दिलगिरी व्यक्त केली.

‘माझ्या वक्तव्यावरुन वाद सुरु झाल्याचं लक्षात येताच मी एक पत्रक काढून तात्काळ माफी मागितली होती. समाजापेक्षा मी मोठा नाही. तरीही कोणाच्या भावना दुखावल्या असल्यास मी पुन्हा एकदा दिलगिरी व्यक्त करतो.’ असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

LATEST VIDEOS

LiveTV