वसई : भरधाव कंटेनरची धडक, बाईक रायडरचा मृत्यू

24 Dec 2017 11:32 PM

बाइक रायडर वरुण बामरोटीचा आज सकाळी साडे सात वाजता अपघातात मृत्यू झालाय. मुंबई अहमदाबाद महामार्गावरील वसई फाटा येथे तो कंटेनरच्या चाकाखाली आला. अपघाताची भीषणता इतकी होती की त्याचा जागीच मृत्यू  झाला. वरुण बीएमडब्ल्यू जीएस बाईकवरुन प्रवास करत होता.
दरम्यान वरुण वरुण लवकरच एअर लाईन्स मध्ये पायलट म्हणून जॉईन होणार होता. त्यासाठीचं ट्रेनिंग देखील त्याने नुकतंच पूर्ण केलं होतं.

LATEST VIDEOS

LiveTV