वसई: मुलावरचं संकट आईने परतवून लावलं, हल्लेखोराला पकडलं

13 Oct 2017 09:21 AM

मुलावर येणारे संकट दूर करण्यासाठी मातेच्या अंगात कसं दहा हत्तींचं बळ संचारत याची प्रचिती वसईमध्ये आलीय. बुधवारी सायंकाळी गुलमोहर सोसायटीत पूजा जिजोट या महिलेच्या घरी अचानक रसूल खानने प्रवेश केला आणि मुलाला मारण्यासाठी चाकू उगारला. परंतु त्या मातेने आपली सर्व ताकत पणाला लावून स्वतःचा आणि मुलाचा जीव वाचवला. इतकेच नाही तर त्या मारेकऱ्याला पोलीसांच्या ताब्यात देखील दिलं. 

LATEST VIDEOS

LiveTV