मुंबई : मनसेच्या विभाग अध्यक्षांसह 5 जणांना मारहाण, दोन आरोपी अटकेत

27 Nov 2017 02:42 PM

विक्रोळीत मनसेचे उपविभाग प्रमुख विश्वजित ढोलम यांना फेरीवाल्यांनी मारहाण केल्याचा आरोप होत आहे. ढोलम यांच्यावर सध्या महात्मा फुले रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

मराठी पाट्यांसाठी दुकानदारांना निवेदन देताना मारहाण झाल्याचा दावा ढोलम यांनी केला आहे. त्या माराहाणीत ढोलम चांगलेच जखमी झाले असून, त्यांच्यावर महात्मा फुले रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

दरम्यान, यापूर्वी मुंबईतील मालाड परिसरात मनसे विभाग प्रमुखाला फेरीवाल्यांनी मारहाण केल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. मालाडमधील मनसेचे विभागप्रमुख सुशांत माळवदे यांना मारहाण झाली होती.

यावेळी मारहाण करणाऱ्या दोघांनाच मनसे कार्यकर्त्यांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं होतं.

LATEST VIDEOS

LiveTV