ओखीचा तडाखा : विरार : अर्नळ्यामध्ये लाखो रुपयांची सुकी मासळी वाहून गेली

05 Dec 2017 04:27 PM

ओखीच्या तडाख्यामुळं आता होणारं नुकसान समोर येऊ लागलं आहे. विरार जवळच्या अर्नाळा समुद्रकिनाऱ्यावर वाळू घातलेली लाखो रुपयांची सुकी मासळी वादळी वाऱ्यामुळं वाहून गेली आहे. इथं रात्रीपासून वाऱ्यासह पाऊस होतो आहे. त्यामुळं मासळी वाळू घातलेल्या बांबुच्या ओळणींची मोडतोड झाली. आणि ही मासळी समुद्रात वाहून गेली. शिवाय समुद्र किनाऱ्यावर जवळ असणाऱ्या घरांचंही मोठं नुकसान झालं आहे.

LATEST VIDEOS

LiveTV