कोलकाता कसोटीत विराटचं शतकांचं अर्धशतक

20 Nov 2017 05:45 PM

विराट कोहलीनं कोलकाता कसोटीत कर्णधारास साजेशी खेळी करुन आंतरराष्ट्रीय शतकांचं अर्धशतक साजरं केलं. त्याच्या या झुंजार खेळीने टीम इंडियाला पराभवाच्या संकटातूनही वाचवलं. विराट कोहलीचं कसोटी कारकीर्दीतलं हे अठरावं शतक ठरलं. वन डे सामन्यांच्या कारकीर्दीत विराटच्या खजिन्यात 32 शतकं आहेत.

कसोटीतील 18 + वन डेतील 32 अशी कोहलीची 50 शतकं आहेत. सर्वाधिक आंतरराष्ट्रीय शतकं झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो आठव्या स्थानावर दाखल झाला आहे.

LATEST VIDEOS

LiveTV