ठाणे : वागळे इस्टेटमधील लाकडाच्या गोदाम जळून खाक

03 Nov 2017 02:15 PM

ठाण्यातल्या वागळे इस्टेट परिसरातील लाकडाच्या गोडाऊन मोठी आग लागली आहे. सकाळी ११.३० च्या सुमारास ही आग लागल्याचं निदर्शनास आलं. त्यानंतर ताबडतोब अग्निशमन दलाच्या ३ गाड्या इथं दाखल झाल्या. गेल्या दीड तासांच्या प्रयत्नानंतर आग अटोक्यात आली आहे. सुदैवाने आगीमध्ये जीवितहानी झाली नाही. मात्र यामुळे लाखो रुपयांची लाकडं जळून खाक झाली आहे.

LATEST VIDEOS

LiveTV