वर्धा : हल्लाबोल आंदोलनात सुप्रिया सुळेंचा ठेका तर चित्रा वाघ यांची फुगडी

04 Dec 2017 12:06 PM

राष्ट्रवादी काँग्रेसकडून सरकारविरोधात सुरु असलेल्या हल्लाबोल आंदोलनाचा आज चौथा दिवस आहे. यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी पारंपरिक आदिवासी नृत्यावर ठेका धरला. हल्लाबोल आंदोलनाच्या दिवसाची सुरुवात वर्ध्यातून झाली. या आंदोलनात बिडी गावजवळ मेळघाटाहून आलेले काही आदिवासी मंडळी सहभागी झाले. तर राष्ट्रवादीच्या नेत्या चित्रा वाघ यांनीही पदयात्रेदरम्यान आदिवासी मंडळींसोबत फुगडी घातली.

LATEST VIDEOS

LiveTV