वर्धा : शेतकऱ्यांच्या आग्रहाखातर सुप्रिया सुळे आणि धनंजय मुंडेंनी कापसावर ट्रॅक्टर फिरवला

07 Dec 2017 09:57 PM


बोंडअळीनं हैराण झालेल्या कापूस उत्पादकानं आपली व्यथा आणि संताप हल्लाबोल आंदोलन करणाऱ्या राष्ट्रवादी नेत्यांसमोर मांडल्या.
शेतकऱ्यांच्या आग्रहाखातर आज वर्ध्यामध्ये सुप्रिया सुळे आणि धनंजय मुंडे यांनी शेतात आपले ट्रॅक्टर फिरवले...वर्ध्यातल्या पवनार गावात
सुरवातीला नेत्यांसमोरच शेतकऱ्यानं कापसावर ट्रॅक्टर फिरवण्याचा
प्रयत्न केला. यावेळी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी विनवणी करुनही शेतकऱ्यांनी ऐकलं नाही. उलट त्यांनी खुद्द धनंजय मुंडेंनाच
ट्रॅक्टरवर बसवलं आणि त्यांनाच कापसावर ट्रॅक्टर चालवायला सांगितलं.. बोंडअळीमुळं कापूस उत्पादक हैराण झालेला असताना सरकार मात्र त्याकडे साफ दुर्लक्ष करत असल्याचा आरोप यावेळी विरोधकांनी केलाय.

LATEST VIDEOS

LiveTV