वाशिम : रिसोडमध्ये माणुसकीला काळिमा फासणारी घटना, जखमी वानराला अमानुष मारहाण

16 Dec 2017 10:51 PM

वाशिम जिल्ह्यातल्या रिसोड तालुक्यात माणुसकीला काळिमा फासणारी एक घटना घडली. कुऱ्हा गावात एका व्यक्तीनं जखमी वानराला लाठीकाठीने बेदम मारहाण करून जीवे मारले. तसेच हे वानर मेल्यावर त्याला झाडाला उलटे टांगून चपलनेही मारहाण केली. विशेष म्हणजे या इसमानं या घटनेचा व्हिडीओ चित्रीकरण करून इतर ते व्हाट्सअॅप ग्रुपवर व्हायरल सुद्धा केले. पवन बांगर अस या इसमाचं नाव असून त्य़ाच्यावर कारवाईची मागणी होत आहे.


LATEST VIDEOS

LiveTV