वाशिम : माणुसकीला काळीमा, जखमी वानराला बेदम मारहाण करुन जीवे मारलं

17 Dec 2017 08:33 AM

वाशिम जिल्ह्यातल्या रिसोड तालुक्यातून माणुसकीला काळिमा फासणारी एक घटना समोर आली आहे. कुऱ्हा गावात एका व्यक्तीनं जखमी वानराला लाठीकाठीने बेदम मारहाण करून जीवे मारलं आहे.

तसेच या वानराच्या मृत्यूनंतर त्याला झाडाला उलटे टांगून चपलनेही मारहाण केली. विशेष म्हणजे या इसमानं या घटनेचा व्हिडीओ चित्रीकरण करून इतर ते व्हाट्सअॅप ग्रुपवर व्हायरल सुद्धा केले.

LiveTV