वाशिम : शेततळ्यात विष टाकल्यामुळे तीन लाख माशांचा मृत्यू

23 Oct 2017 12:06 PM

वाशिमच्या गोलवाडीत एका शेततळ्यातील तब्बल 3 लाख मासे मृत्युमुखी पडलेत. शेततळ्यात अज्ञात व्यक्तीनं विषारी द्रव्य टाकल्यानं ही घटना घडली आहे. गोलवाडीतील माणिकराव शिंदे शेतीला जोडधंदा म्हणून मत्स्यपालनाचा व्यवसाय करतात. माशांना खाद्य टाकण्यासाठी माणिकराव शिंदे शेतात गेले असता तळ्यातील सर्व मासे मृत झाल्याचं त्यांच्या लक्षात आलं. या प्रकरणी मंगळूरपीर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे. गावातील ग्रामपंचायत निवडणुकीच्या वादातून हा प्रकार घडल्याचा संशय आहे.

LATEST VIDEOS

LiveTV