रायगड : खालापूर फूडमॉलजवळ कार-टँकरची जोरदार धडक, तिघांचा मृत्यू

11 Nov 2017 10:51 PM

मुंबई-पुणे एक्स्प्रेस मार्गावर खालापूरनजीक झालेल्या भीषण अपघातात तिघांचा बळी गेलाय. दुपारी 12 च्या सुमारास खालापूरच्या फूडमॉलनजीक हा अपघात झालाय. मुंबईच्या दिशेनं वेगानं येणाऱ्या कारनं पाण्याच्या टँकरला मागून जोराची धडक दिली. या अपघातात कारचा चक्काचूर झाला असून कारमधील दोन महिला आणि एका पुरुषाचा जागीच मृत्यू झाला. कुमार ओसवाल, विमला ओसवाल आणि निधी जैन अशी अपगातातील मृतांची नावं आहेत. दरम्यान, या अपघातामुळं एक्सप्रेस हायवेवरील मुंबईकडे येणारी वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.

LATEST VIDEOS

LiveTV