...तेव्हा आत्महत्येचा विचार मनात आला होता! : कुलदीप यादव

13 Nov 2017 08:39 PM

आपल्या अनोख्या शैलीमुळे अनेकांना कोड्यात पाडणारा चायनामन बॉलर कुलदीप यादवने धक्कादायक खुलासा केला आहे. “आयुष्याच्या एका टप्प्यावर एवढा निराश झालो होतो की, आत्महत्या करण्याचा विचार मनात आला होता,” असं कुलदीप यादवने सांगितलं.

‘तेव्हा आत्महत्येचा विचार मनात आला होता’
कानपूरमध्ये बोलताना कुलदीप यादव म्हणाला की, “मला वयाच्या तेराव्या वर्षी 15 वर्षांखालील संघात खेळायचं होतं. निवड होण्यासाठी मी जीव तोडून मेहनत केली होती. परंतु यानंतरही निवड न झाल्याने मी फारच निराश झालो होतो. त्यामुळे मी आत्महत्या करण्याचं निश्चित केलं होतं. पण निराशेच्या दिवसात वडिलांनी माझं मनधैर्य वाढवलं. त्यामुळे मी आणखी मेहनत करु शकलो.

LATEST VIDEOS

LiveTV