प्रसाद लाड यांची राजकीय कारकीर्द

27 Nov 2017 12:09 PM

शिवसेनेचा कडवा विरोध, हिवाळी अधिवेशन आणि गुजरात निवडणुकांच्या रणसंग्रामाच्या पार्श्वभूमीवर नारायण राणे यांचा विधानपरिषेदतला पत्ता कट झाला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये आयात झालेल्या प्रसाद लाड यांना लॉटरी लागली आहे.

विधानपरिषद पोटनिवडणुसाठी भाजपकडून प्रसाद लाड यांना उमेदवारी मिळाली आहे. आज सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास प्रसाद लाड उमेदवारी अर्ज दाखल करतील.  तर काँग्रेसकडून सोलापूरचे माजी आमदार दिलीप माने उमेदवारी अर्ज भरण्याची शक्यता आहे.

दरम्यान, पोटनिवडणुकीसाठी शिवसेनेने प्रसाद लाड यांना पाठिंबा दिला आहे.

पुढील महिन्यात 7 डिसेंबर रोजी विधानपरिषदेच्या एका जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे. नारायण राणे यांनी राजीनामा दिल्यानंतर ही जागा रिक्त झाली होती.

LATEST VIDEOS

LiveTV