तंदुरुस्तीसाठी महिलांनी झाडू मारावा, राजस्थानचा शिक्षण विभागाचा अजब फतवा

12 Nov 2017 07:24 PM

महिलांच्या सबलीकरण आणि सशक्तीकरणासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत असताना दिसतं. पण दुसरीकडे भाजपच्या वसुंधरा राजेंच्या सरकारमधील शिक्षण विभागानं नवा सल्ला दिला. तंदुरुस्त राहण्यासाठी महिलांनी घरात झाडू मारावा असा अजब सल्ला राजस्थानच्या शिक्षण विभागानं काढला. यावेळी राजस्थान शिक्षण विभागानं प्रकाशित केलेल्या शिविरा अंकात ‘तंदुरूस्त राहण्याचे सोपे उपाय’ या शीर्षकाखाली एक लेख प्रकाशित करण्यात आला आहे. त्या लेखात महिलांनी तंदुरुस्तीसाठी सकाळी-सकाळी फिरायला जाणं, पळणं, सायकल चालवणं यासह दळण दळणे, पाणी भरणं, झाडू मारणं, फरश्या पुसणं या घरकामांमुळेही चांगला व्यायाम होतो त्यामुळे घरकामं किंवा कोणताही खेळप्रकार, व्यायाम हा उपाय असल्याचंही म्हटलं.

LATEST VIDEOS

LiveTV