यवतमाळ: ग्रामीण रुग्णालयातून 2 दिवसांचं बाळ चोरीला

08 Nov 2017 11:12 AM

यवतमाळ जिल्ह्यातल्या वणी ग्रामीण रुग्णालयातून 2 दिवसांचं बाळ चोरीला गेल्याची घटना घडली आहे...नुसरत बानो असं मातेचं नाव असून तिने या रुग्णालयात दोन दिवसांपूर्वी एका मुलाला जन्म दिला होता...मात्र आज पहाट अज्ञातांनी नुसरत झोपलेली असताना बाळ चोरून नेलं...धक्कादायक बाब म्हणजे, या रुग्णालयात सीसीटीव्ही यंत्रणा आहे मात्र ती बंद आहे, शिवाय सुरक्षा रक्षकही जागेवर नसतात, याच भोंगळ कारभाराचा फायदा घेऊन या चोरट्यांनी डाव साधला...त्यामुळं आता या ग्रामीण रुग्णालयावर कडक कारवाईची मागणी केली जातेय...

LATEST VIDEOS

LiveTV