यवतमाळ : कीटकनाशक फवारणी बाधित शेतकरी कुटुंबांना 'नाम'ची आर्थिक मदत

20 Nov 2017 03:42 PM


कीटकनाशक फवारणीमुळे बळी पडलेल्या 21 शेतकऱ्यांच्या कुटुंबाला नाम फौंडेशनतर्फे आर्थिक मदत करण्यात आली. पीडीत कुटुंबातील महिलांना आत्मनिर्भर करण्यासाठी ही मदत असल्याचं नाम फौंडेशनकडून सांगण्यात आलंय. कुटुंबाचा गाडा चालविण्याचे कसब महिलांकडे असते. मात्र महिलांनी बचतीची सवय लावली पाहिजे असं नाम फौंडेशनचे विदर्भ आणि खानदेश समन्वयक हरीश इथापे यांनी सांगितलं. यावेळी चार आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना आणि सर्पदंश झाल्यामुळे बैलाचा मृत्यू झालेल्या शेतकऱ्यालाही आर्थिक मदत करण्यात आली.

LiveTV