यवतमाळ : मुख्यमंत्री फडणवीस आणि गडकरींकडून आघाडी सरकारच्या कारभाराचे वाभाडे

25 Dec 2017 09:12 PM

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी गेल्या सरकारच्या कारभाराचे वाभाडे काढले. आघाडी सरकारने आम्हाला रिकामी तिजोरी आणि प्रश्नांचा डोंगर दिला. एकवेळ आमच्या हातून चूक होऊ शकते पण बेईमानी नाही अशा शब्दात  मुख्यमंत्र्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीला लक्ष्य केलं. नितीन गडकरी यांनी आपल्या मिश्किल शैलीत काँग्रेस-राष्ट्रवादीची फिरकी घेतली. तर आघाडी सरकारच्या कार्यकाळात अनेक प्रकल्प अर्धवट राहिलेत. हे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी हवा तेवढा पैसा देण्याची आपली तयारी आहे असं नितीन गडकरी म्हणाले. यवतमाळ जिल्ह्यातील घारफळमध्ये बळीराजा जलसंजीवनी योजनेचा शुभारंभ झाला त्यावेळी ते बोलत होते.

LiveTV