नाशिक : येवल्याजवळील चिंचोडीमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ, एकाच रात्री दोन घरफोड्या

15 Nov 2017 08:09 PM

नाशिक जिल्ह्यातल्या येवल्या तालुक्यातील चिचोंडी गावात एकाच रात्री दोन घरफोड्या झाल्यानं खळबळ उडाली. सर्वप्रथम चोरट्यांनी रामा मढवई यांच्या घरात भिंत फोडून प्रवेश केला. घरातील एका पेटीत ठेवलेले सोन्याचे दागिने चोरट्यांनी लंपास केले. त्यानंतर चोरट्यांनी सोमनाथ मढवई यांच्या घराच्या दरवाज्याचा कडी-कोयंडा तोडून आत प्रवेश केला. धान्याच्या कोठीत ठेवलेले सोन्याचे दागिने चोरट्यांनी डल्ला मारला त्यानंतर काही अंतरावर असलेल्या रेवणाथ पाळे यांच्या घराचा कडी-कोयंडा तोडला मात्र घरातील लोकांना जाग आल्याने चोरट्यांचा प्रयत्न फसला. दोन ठिकाणी झालेल्या चोरीत चोरट्यांनी जवळपास एक लाखाचा मुद्देमाल लंपास केला.

LATEST VIDEOS

LiveTV