औषधांची छोटी पाकिटं मिळणार, मोठ्या स्ट्रिप्सची सक्ती नाही

22 Dec 2017 03:24 PM

औषधाची एखाद-दुसरी गोळी घ्यायची आवश्यकता असताना संपूर्ण पाकीट घेण्याची सक्ती मेडिकल दुकानदाराकडून केली जाते. मात्र आता औषधांची छोटी पाकिटं तयार करण्याचे आदेश अन्न आणि औषध प्रशासन विभागाने औषध विक्रेत्यांना दिले आहेत.
औषधांचं मोठं पाकीट विकत घेण्याऐवजी लवकरच रुग्णांना गरजेनुसार छोट्या आकाराची पाकिटं खरेदी करता येणार आहेत. त्यामुळे अख्खं पाकीट विकत घेण्याची सक्ती रुग्णांना करावी लागणार नाही. एफडीएने ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाला पत्र पाठवून औषधांची छोटी पाकिटं तयार करण्याचं निवेदन दिलं होतं.

LiveTV