मुंबई : आता गरजेनुसारच औषध विकत घ्या, संपूर्ण पाकिट घेण्याची सक्ती नाही

22 Dec 2017 10:24 AM

औषधांचे संपूर्ण पाकीट विकत घेण्याऐवजी लवकरच रुग्णांना गरजेनुसार औषध खरेदी करता येणार आहे. त्यामुळे संपूर्ण पाकीट विकत घेण्याची सक्ती करता येणार नाही. याविषयी अन्न आणि औषध प्रशासन विभागाने औषध विक्रेत्यांना नुकतेच निर्देश दिले आहेत. त्याचप्रमाणे ड्रग कंट्रोलर जनरल आॅफ इंडियालाही एफडीएने पत्र पाठवून औषधांची लहान पाकिटं तयार करण्याविषयी निवेदन दिलं आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या या निर्णयामुळे औषधांचा अपव्यय आणि दुष्परिणामांना आळा बसेल, असं सांगण्यात आलं आहे.

LiveTV