190 किलो वजनाच्या दहा वर्षीय चिमुरड्या आर्यवर शस्त्रक्रिया

By: | Last Updated: > Thursday, 25 May 2017 3:25 PM
10-year-old Indonesian boy weighs 190 kg due to junk food addiction latest news

जकार्ता : जंक फूड आणि आहाराच्या वाईट सवयींमुळे तुमच्या चिमुरड्यांवर काय परिणाम होऊ शकतो, याचा विचार करण्याची वेळ आली आहे. इंडोनेशियामधील अवघ्या दहा वर्षांच्या चिमुरड्याचा लठ्ठपणा प्रमाणाबाहेर वाढला आहे. आर्यचं वजन थोडं-थोडकं नव्हे, तर तब्बल 190 किलो झालं आहे. आर्यवर शस्त्रक्रिया करण्यात आली.

सॉफ्ट ड्रिंक्स आणि नूडल्ससारखे अरबट-चरबट पदार्थ खाण्याचा नाद, मुख्य म्हणजे जंक फूड खाण्याचा पोरांचा हट्ट पुरवण्याची पालकांची सवयच आर्यच्या अंगलट आली आहे. दिवसातून पाचवेळा भात, नूडल्स आणि मांस खाऊनही आर्यची भूक भागत नसल्याचं पालकांच्या लक्षात आलं आणि त्यांनी डॉक्टरांकडे धाव घेतली.

गलेलठ्ठ आर्यला पाहून डॉक्टरही अवाक झाले. त्यांनी आर्यसाठी सक्तीचा डाएट प्लान आखून दिला. मात्र त्यांचे हे प्रयत्न व्यर्थ ठरले, कारण चिमुरड्याचं वजन जराही कमी झालं नाही. अखेर पोटाचा ढेर कमी करण्यासाठी त्यांनी शस्त्रक्रियेचा पर्याय निवडला.

सर्जरीनंतर आर्यचं वजन 16 किलोंनी कमी झालं. नंतरच्या कालावधीत हे वजन आणखी दोन किलोंनी घटलं आहे. वर्षभरात आर्यचं वजन शंभर किलोच्या आत आणण्याचा डॉक्टरांचा मानस आहे. भूकेशी संबंधित हार्मोन्सवर नियंत्रण मिळवल्याने त्याची भूक आटोक्यात येईल, अशी आशा डॉक्टरांना आहे.

आर्यवर मेक्सिकोमध्ये उपचार सुरु आहेत. जगातील सर्वात लठ्ठ पुरुष असलेल्या जुआन पेड्रो फ्रँको याच्यावरही मेक्सिकोतच शस्त्रक्रिया झाली होती. काहीच महिन्यांपूर्वी जगातील तत्कालीन सर्वात लठ्ठ महिला इमान अहमदवरही मुंबईत सर्जरी झाली होती.

Lifestyle News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:10-year-old Indonesian boy weighs 190 kg due to junk food addiction latest news
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

गुडघा प्रत्यारोपण शस्त्रक्रिया आता स्वस्त होणार!
गुडघा प्रत्यारोपण शस्त्रक्रिया आता स्वस्त होणार!

नवी दिल्ली : गुडघा प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी रुग्णांची होणारी

तुम्ही डिप्रेशनमध्ये आहात का? इंस्टाग्राम उत्तर देणार
तुम्ही डिप्रेशनमध्ये आहात का? इंस्टाग्राम उत्तर देणार

मुंबई : तुम्ही अनेकदा डिप्रेशनमध्ये असता तेव्हा तुमचं सोशल मीडिया

आई, तुला स्तनपानावर भरोसा नाय काय... वाडिया हॉस्पिटलची जनजागृती
आई, तुला स्तनपानावर भरोसा नाय काय... वाडिया हॉस्पिटलची जनजागृती

मुंबई : गल्लीपासून दिल्लीपर्यंत सध्या ‘सोनू’च्या गाण्याचीच चर्चा

फेसबुकवरील मॅट्रिमोनी जाहिरात व्हायरल, तरुणावर स्थळांचा वर्षाव
फेसबुकवरील मॅट्रिमोनी जाहिरात व्हायरल, तरुणावर स्थळांचा वर्षाव

थिरुअनंतपुरम : सोशल मीडियाचे अनेक गैरवापर होतात, असं आपण बऱ्याचदा

तुम्ही तुमची भांडी जीवाणूंनी घासत आहात?
तुम्ही तुमची भांडी जीवाणूंनी घासत आहात?

मुंबई : तुम्ही घरातील भांडी धुवण्यासाठी वापरत असलेला स्पंज

...म्हणून केकवरील मेणबत्यांवर फुंकर मारु  नये: रिसर्च
...म्हणून केकवरील मेणबत्यांवर फुंकर मारु नये: रिसर्च

मुंबई: वाढदिवसाचा केक कापताना आपण बऱ्याचदा त्यावर लावलेल्या

तुम्हीही रोज 2 तास ड्रायव्हिंग करत असाल तर ही बातमी नक्की वाचा!
तुम्हीही रोज 2 तास ड्रायव्हिंग करत असाल तर ही बातमी नक्की वाचा!

मुंबई : तुम्हीही रोज दोन तास किंवा त्यापेक्षा अधिक ड्रायव्हिंग करता

सुरक्षारक्षक कायम गॉगल का घालतात?
सुरक्षारक्षक कायम गॉगल का घालतात?

मुंबई : तुम्ही कधी व्हीआयपी व्यक्तींच्या मागे उभे असलेल्या

तुमच्याही मुलांना लठ्ठपणाची समस्या सतावतेय?
तुमच्याही मुलांना लठ्ठपणाची समस्या सतावतेय?

नवी दिल्ली : आरोग्याची समस्या सध्या कामकाज करणाऱ्या व्यक्तींसोबतच