व्हाईट हाऊसबाहेरील गवत कापण्याचं काम 11 वर्षीय चिमुकल्याकडे

व्हाईट हाऊसमध्ये अवघ्या 11 वर्षांचा चिमुकल्याला काम देण्यात आलं आहे. फ्रॅन्क असं या चिमुकल्याचं नाव असून, त्याला व्हाईट हाऊसबाहेरील गवत कापण्याचं काम देण्यात आलं आहे.

व्हाईट हाऊसबाहेरील गवत कापण्याचं काम 11 वर्षीय चिमुकल्याकडे

वॉशिंग्टन : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचं निवासस्थान असलेल्या व्हाईट हाऊसमध्ये अवघ्या 11 वर्षांचा चिमुकल्याला काम देण्यात आलं आहे. फ्रॅन्क असं या चिमुकल्याचं नाव असून, त्याला व्हाईट हाऊसबाहेरील गवत कापण्याचं काम देण्यात आलं आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांची व्यावसायिक पार्श्वभूमी पाहून फ्रॅन्क अगदी भारावून गेला होता. ट्रम्प यांच्यापासून प्रेरणा घेऊन त्यांनं स्वत: चा व्यवसायच सुरू केला.

व्हाईट हाऊसमध्ये मला संधी मिळाल्यास मी स्वत: ला भाग्यवान समजेन, असं पत्रच फ्रॅन्कने डोनाल्ड ट्रम्प यांना लिहिलं होतं. फ्रॅन्क हा व्हाईट हाऊस जवळच्या फॉल्स चर्च परिसरातला रहिवासी आहे.

दरम्यान, फ्रॅन्क नक्कीचं चांगलं काम करेल, असा विश्वास डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केला आहे. तसेच त्याच्या सोबतचा एक व्हिडीओ देखील अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन पोस्ट केला आहे.

विश्व शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV