घुबडाप्रमाणे 180 अंशात मान वळवणाऱ्या समीरची इंटरनेटवर चर्चा

दरम्यान, मोहम्मद समीरचा व्हिडीओ बघणाऱ्यांनी त्याचं अनुकरण करु नये.

घुबडाप्रमाणे 180 अंशात मान वळवणाऱ्या समीरची इंटरनेटवर चर्चा

कराची : तुम्हा-आम्हाला घुबडाप्रमाणे 180 अंशात मान वळवता आली तर बसल्या जागी आपल्या पाठीमागचंही सहज बघता आलं असतं. पण तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की पाकिस्तानात असा एक मुलगा आहे जो 180 अंशांत आपली मान वळवू शकतो.

या करामती मुलाचं नाव मोहम्मद समीर असून तो अवघ्या 14 वर्षाचा आहे. समीर आपल्या हातांचा आधार घेत आपली मान पूर्ण मागे पाठीकडे वळवतो. आपली मान अशा पद्धतीने वळवण्यासाठी तो खूप प्रॅक्टिसही करत असतो.

Pakistan Boy Neck Twist
मोहम्मद समीर म्हणाला की, "6-7 वर्षांचा असताना मी हॉलिवूड सिनेमात एका अभिनेत्याचा स्टंट पाहिला होता, ज्यात तो आपली मान मागे वळवतो. हे मला फारच आकर्षक वाटल्याने मी त्याची प्रॅक्टिस करायला सुरुवात केली. काही महिन्यानंतर मी यात यशस्वी झालो."

"सुरुवातीला मी असं करताना आईने मला थोबाडीत मारली. पण नंतर तिलाही माझी कला म्हणजे ईश्वराची देण असल्याचं पटलं. त्या अभिनेत्याप्रमाणे हॉलिवूडमध्ये काम करण्याची माझी इच्छा आहे," असं मोहम्मद समीर यांनी सांगितलं.

दरम्यान, मोहम्मद समीरचा व्हिडीओ बघणाऱ्यांनी त्याचं अनुकरण करु नये.
पाहा व्हिडीओ

विश्व शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: 14 years old Pakistani boy can turn head 180-degrees
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV