लंडनच्या ऑक्सफर्ड ट्यूब स्टेशनमध्ये फायरिंगच्या अफवेमुळे चेंगराचेंगरी

लंडनच्या ऑक्सफर्ड ट्यूब स्टेशनमध्ये फायरिंगच्या अफवेनंतर मोठा गोंधळ उडाला. यात स्टेशनमधील लोकांनी रस्त्यावर पळण्यासाठी एकच गर्दी केली. त्यामुळे झालेल्या चेंगराचेंगरीत 16 नागरिक गंभीर जखमी झाले आहेत.

लंडनच्या ऑक्सफर्ड ट्यूब स्टेशनमध्ये फायरिंगच्या अफवेमुळे चेंगराचेंगरी

लंडन :  लंडनच्या ऑक्सफर्ड ट्यूब स्टेशनमध्ये फायरिंगच्या अफवेनंतर मोठा गोंधळ उडाला. यात स्टेशनमधील लोकांनी रस्त्यावर पळण्यासाठी एकच गर्दी केली. त्यामुळे झालेल्या चेंगराचेंगरीत 16 नागरिक गंभीर जखमी झाले आहेत.

भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 11.30 वाजता फायरिंगची अफवा उठली. यामुळे सुमारे अडीच तास लोक दहशतीत होते. घाबरुन लोकांनी रस्त्यावर पळण्यास सुरुवात केली आणि मोठ्या गर्दीमुळे चेंगराचेंगरी झाली.

या घटनेनंतर स्थानिक पोलिसांसह स्कॉटलॅण्ड यार्डचे पोलिसही घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान हा सर्व प्रकार कसा घडला, अफवा कुणी पसरवली याचा कसून शोध सुरु आहे.

विश्व शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: 16 people wounded in londan after rumor of firing
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV