इजिप्तमध्ये मशिदीवर दहशतवादी हल्ला, 235 जणांचा मृत्यू  

उत्तर सिनई प्रांतातल्या मशिदीवर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात तब्बल 235 जणांचा मृत्यू झाला आहे तर सव्वाशेहून अधिक जण जखमी झाले आहेत.

इजिप्तमध्ये मशिदीवर दहशतवादी हल्ला, 235 जणांचा मृत्यू  

सिनई (इजिप्त) : दहशतवाद्यांच्या हल्ल्यानं पुन्हा एकदा इजिप्त हादरलं आहे. उत्तर सिनई प्रांतातल्या मशिदीवर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात तब्बल 235 जणांचा मृत्यू झाला आहे तर सव्वाशेहून अधिक जण जखमी झाले आहेत.

अल-अरिश शहरातील रवाडा मशिदीमध्ये नमाजाच्या वेळी दहशतवाद्यांनी बॉम्बस्फोट घडवून आणले. तसंच अंधाधुंद गोळीबारही केला. नमाजाच्या वेळी मशिदीमध्ये गर्दी असल्यानं एकच पळापळ झाली. याचाच फायदा दहशतवादयांनी घेतला. या हल्ल्यातील मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, या हल्ल्याची अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेनं जबाबदारी घेतलेली नाही.

पाहा नेमका हल्ला कुठे झाला :

विश्व शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: 235 people have been killed in a bomb and gun attack on a mosque in Egypt’s latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV