वेल्डिंग मास्क घालून सौरऊर्जेवर चिकन शिजवणारा शेफ!

By: | Last Updated: > Monday, 22 May 2017 12:51 PM
A man who cook chicken with just the power of the sun in Thailand latest news updates

बँकॉक : लहान-मोठे कोणतेही शेफ वेल्डिंग मास्क घालून किचनमध्ये प्रवेश करत नाही. पण सिला सोथ्यूरट कोणतंही इंधन न वापरता सूर्याच्या ऊर्जेवर चिकन शिजवायला आवडतं.

दक्षिण बँकॉकमधील 60 वर्षीय सिला सोथ्यूरट यांचं रस्त्याला लागून हॉटेल आहे. पण ते आपल्या ग्राहकांना थोड्या वेगळ्याप्रकारे जेवण देतात. सौरऊर्जेचा वापर करुन शिजवलेलं अन्न ते ग्राहकांना वाढतात.

हलवता येणारी एक हजार आरशांची भिंत वापरुन सिला सोथ्यूरट चिकन शिजवतात. ही भिंत त्यांनी स्वत:च डिझाईन आणि बनवली आहे. आरशांच्या भिंतीद्वारे सूर्यकिरण मॅरिनेट केलेल्या चिकनवर पडतं आणि तीव्र उष्णतेने चिकन शिजतं.

“ही अनोखी पद्धत वापरुन सौरऊर्जेवर चिकन शिजवण्याची कल्पना ऐकून अनेकांच्या भुवया उंचावल्या होता. अनेकांनी मला वेडं ठरवलं. अशाप्रकारे चिकन शिजवणं अशक्य असल्याचं त्यांचं म्हणणं होतं. पण जसजशी वेळ निघून गेली, लोक म्हणाले, खरंच तू ही कल्पना सत्यात उतरवलीस,” असं सिला सोथ्यरट यांनी सांगितलं.

ओव्हनला जेवढी उष्णता लागते, तेवढीच तीव्र उष्णता सौर परावर्तक निर्माण करतात. सूर्याच्या ऊर्जेमुळे चिकन अवघ्या 12 मिनिटांत शिजून तयार होतं.

सिला सोथ्यूरट मागील 20 वर्षांपासून आपल्या ग्राहकांसाठी सौरऊर्जेवर शिजवलेलं चिकन वाढतात. पण त्यांचा सोलर कूकरचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर खवय्ये थायलंडच्या कानाकोपऱ्यातून फेटचाबुरी प्रातांतील त्यांच्या हॉटेलला भेट देत आहेत.

याबाबत बोलताना सिला सोथ्यूरट म्हणाले की, “1997 मध्ये मला ही कल्पना सुचली. एक दिवस बसमधून परावर्तीत झालेलं सूर्यकिरण माझ्यावर डोळ्यावर पडले. खिडकीवर पडलेल्या सूर्यकिरणामुळे उष्णता निर्माण होते, तर त्याचं ऊर्जेत रुपांतर करता येऊ शकतं, असा विचार मी केला.”

पारंपरिक कोळशावर शिजणाऱ्या चिकनपेक्षा सौरऊर्जेवर शिजणारं चिकन सगळीकडून समान शिजतं, असा दावाही सोथ्यूरट करतात. तसंच थांयलंड हा उष्णकटिबंधातील हवामान क्षेत्रात येत असल्याने तिथला सूर्यप्रकार स्वच्छ आहे आणि पूर्णपणे ऊर्जेचा स्रोत आहे,

“पेट्रोल आणि गॅस सिलेंडर महाग होतं आणि काही जण लाकडाचीही विक्री करत होते. त्यामुळे मी विचार केला की, सौरऊर्जेचा वापर केल्यास मी बरीच बचत करु शकतो. शिवाय प्रदूषणही कमी होईल,” असंही सोथ्यूरट यांनी सांगितंल.

सिला आणि त्यांच्या पत्नी पानस्री आता दरदिवशी 40 चिकन तसंच डुकराचं मांसही शिजवतात.

इथलं चिकन अतिशय रुचकर आहे. शिवाय ते जास्त जळलेलंही नसतं आणि कोळशावर शिजलेल्या चिकनप्रमाणे त्याचा वास येत नाही, अशी प्रतिक्रिया तिथे भेट देणारे ग्राहक देतात. हीच सिला सोथ्यूरट यांच्या अनोख्या कल्पनेला मिळालेली पावती आहे.

पाहा व्हिडीओ

(हा व्हिडीओ AFP चा आहे. इथे प्ले न झाल्यास, लिंकवर क्लिक करा, AFP च्या यू ट्यूब चॅनलवर व्हिडीओ पाहता येईल)

First Published:

Related Stories

महिला बचत गटाच्या सॅनिटरी नॅपकिनवर जीएसटी नाही : सरकार
महिला बचत गटाच्या सॅनिटरी नॅपकिनवर जीएसटी नाही : सरकार

मुंबई : सॅनिटरी नॅपकिन जीएसटीतून वगळण्यासाठी सुरु असलेल्या

लहान मुलांच्या डोळ्यांसाठी खास टिप्स
लहान मुलांच्या डोळ्यांसाठी खास टिप्स

मुंबई: सध्या लहान मुलांच्या डोळ्यावर भल्या मोठ्या काचेचा चष्मा

रागावर नियंत्रण करणारी खास योगासने!
रागावर नियंत्रण करणारी खास योगासने!

मुंबई: आपली जीवनशैली सध्या फारच धकाधकीची झाली आहे. अशावेळी आपल्याला

मेनोपॉज अर्थात रजोनिवृत्ती काळात कोणती काळजी घ्यावी?
मेनोपॉज अर्थात रजोनिवृत्ती काळात कोणती काळजी घ्यावी?

मुंबई : रजोनिवृत्ती म्हणजे शेवटची पाळी. शेवटची पाळी येण्याआधी तीन

आता 'उबर'नं प्रवास करणाऱ्यांसाठी 'उबरपास' मिळणार!
आता 'उबर'नं प्रवास करणाऱ्यांसाठी 'उबरपास' मिळणार!

नवी दिल्ली : मोबाईल अॅपवर आधारित टॅक्सी सेवा पुरवणाऱ्या ‘उबर’ने

सावधान... चिमुरड्यांच्या हातात स्मार्टफोन देण्याआधी 'हे' नक्की वाचा
सावधान... चिमुरड्यांच्या हातात स्मार्टफोन देण्याआधी 'हे' नक्की वाचा

मुंबई : अनेकदा मुलांनी शांत बसावं म्हणून काहीजण त्यांच्या हातात

विश्वविक्रमी पिझ्झा... लांबी तब्बल 1.93 किलोमीटर!
विश्वविक्रमी पिझ्झा... लांबी तब्बल 1.93 किलोमीटर!

कॅलिफोर्निया : कॅलिफोर्नियामध्ये दोन किलोमीटरचा पिझ्झा बनवण्यात

ओंतारिओतील लाल कांदा कॅन्सरवर गुणकारी : संशोधन
ओंतारिओतील लाल कांदा कॅन्सरवर गुणकारी : संशोधन

टोरंटो : कॅनडातील ओंतारिओमधील लाल कांदा कर्करोगावर गुणकारी

ट्विटरवरुन पंतप्रधान मोदींकडून योगाचे धडे!
ट्विटरवरुन पंतप्रधान मोदींकडून योगाचे धडे!

नवी दिल्ली : 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योगा दिन साजरा केला जातो. हेच

सावधान! सुट्टीत जास्त झोपाल, तर ‘हा’ त्रास होईल!
सावधान! सुट्टीत जास्त झोपाल, तर ‘हा’ त्रास होईल!

नवी दिल्ली : तुम्ही वीकेंडला अधिक झोप घेता? तर सावधान… कारण