या प्रश्नाचं उत्तर देऊन मानुषी छिल्लर मिस वर्ल्ड बनली!

प्रियंका चोप्रानंतर तब्बल 17 वर्षांनी एखाद्या भारतीय सुंदरीने या किताबावर आपलं नाव कोरलं आहे.

या प्रश्नाचं उत्तर देऊन मानुषी छिल्लर मिस वर्ल्ड बनली!

बीजिंग : भारताच्या मानुषी छिल्लरने 2017 चा मिस वर्ल्ड जिंकून इतिहास रचला आहे. 20 वर्षीय मानुषी ही राजधानी दिल्लीत राहते. ती वैद्यकीय शिक्षण घेत आहे. चीनमध्ये या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे, जिथे मानुषीने इतिहास रचला.

कोणत्या प्रोफेशनला जास्त पगार मिळायला पाहिजे आणि का? असा प्रश्न मानुषीला विचारण्यात आला होता. यावर तिचं उत्तर होतं, की सर्वात जास्त मान आईला मिळायला हवा. जिथपर्यंत पगाराचा विषय आहे, तर पगार पैशांनी नाही, तर सन्मान आणि प्रेमाने दिला पाहिजे.

प्रियंका चोप्रानंतर तब्बल 17 वर्षांनी एखाद्या भारतीय सुंदरीने या किताबावर आपलं नाव कोरलं आहे. यापूर्वी 2000 साली बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्राने या किताबावर नाव कोरलं होतं.

तेव्हापासून आतापर्यंत रेइता फरिया (1966), ऐश्वर्या राय (1994), डायना हेडन (1997), युक्ता मुखी (1999), प्रियंका चोप्रा (2000) आणि 2017 साली मिस वर्ल्ड होण्याचा मान मानुषीला मिळाला.

भारताने आतापर्यंत सहा वेळा हा किताब पटकावला आहे. त्यामुळे सर्वाधिक वेळा मिस वर्ल्डचा किताब पटकावणाऱ्या देशांच्या यादीत भारताचा समावेश झाला आहे.

विश्व शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV