भारतात हार्ट सर्जरी झालेल्या पाकिस्तानी बाळाचा मायदेशी मृत्यू

भारत-पाकिस्तानमधील ताणलेल्या संबंधांच्या पार्श्वभूमीवर कंवल यांना मेडिकल व्हिसा मिळवण्यात अडथळे येत होते. अखेर भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्या मदतीने कंवल यांना व्हिसा मिळाला

By: | Last Updated: > Tuesday, 8 August 2017 11:16 PM
After successful heart surgery in India, Pakistani baby boy dies of dehydration in Lahore latest update

लाहोर : गेल्या महिन्यात मेडिकल व्हिसा काढून हार्ट सर्जरीसाठी भारतात आलेल्या पाकिस्तानी बाळाचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. सोमवारी लाहोरमधील घरी परतल्यानंतर डिहायड्रेशनमुळे चिमुरड्या रोहनची प्राणज्योत मालवली.

चार महिन्यांच्या रोहन सादिकच्या मृत्यूची बातमी त्याचे वडील कंवल सादिक यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. रोहनच्या हृदयात भोक असल्यामुळे शस्त्रक्रियेसाठी त्याला पाकिस्तानहून भारतात आणायचं होतं.

भारत-पाकिस्तानमधील ताणलेल्या संबंधांच्या पार्श्वभूमीवर कंवल यांना मेडिकल व्हिसा मिळवण्यात अडथळे येत होते. अखेर भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्या मदतीने कंवल यांना व्हिसा मिळाला.

12 जुलै रोजी रोहनला भारतात आणण्यात आलं. त्याच्यावर नोएडातील जेपी हॉस्पिटलमधील डॉ. राजेश शर्मा आणि यांच्या टीम 14 तारखेला शस्त्रक्रिया केली. सर्जरीनंतर रोहनच्या कुटुंबीयांनी भारत सरकार आणि स्वराज यांचे आभारही मानले होते.

रविवारी 6 ऑगस्टच्या रात्री डिहायड्रेशनमुळे लाहोरमधील राहत्या घरी रोहनचा मृत्यू झाला. रोहनच्या मृत्यूनंतर ट्वीट करताना त्याच्या वडिलांनी भारतीयांचे आभार व्यक्त केले आहेत.

World News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:After successful heart surgery in India, Pakistani baby boy dies of dehydration in Lahore latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

चीनचा सिचुआन प्रांत भूकंपाने हादरला!
चीनचा सिचुआन प्रांत भूकंपाने हादरला!

पेइचिंग : चीनच्या सिचुआन प्रांत भूकंपानं हादरला असून, भूकंपाची

दक्षिण युरोपमध्ये उष्णतेची लाट, 'ल्युसिफर'मुळे पारा 42 अंशांपार
दक्षिण युरोपमध्ये उष्णतेची लाट, 'ल्युसिफर'मुळे पारा 42 अंशांपार

लंडन : दक्षिण युरोपातील नागरिकांना सध्या भीषण तापमानाचा सामना

पाकिस्तानातून पाठिंबा, ‘मराठा कौमी इतेहाद’ मराठा मोर्चाच्या पाठीशी
पाकिस्तानातून पाठिंबा, ‘मराठा कौमी इतेहाद’ मराठा मोर्चाच्या...

मुंबई: मुंबईत 9 ऑगस्टला होणाऱ्या मराठा क्रांती मूक मोर्चाची राज्यसह

तब्बल 20 वर्षांनंतर पाकिस्तान सरकारमध्ये हिंदू मंत्री!
तब्बल 20 वर्षांनंतर पाकिस्तान सरकारमध्ये हिंदू मंत्री!

इस्लामाबाद : पाकिस्तानचे नवे पंतप्रधान शाहिद खाकन अब्बासी यांच्या

पाकिस्तान सरकारची वेबसाईट हॅक, फ्रंट पेजवर तिरंगा आणि राष्ट्रगीत
पाकिस्तान सरकारची वेबसाईट हॅक, फ्रंट पेजवर तिरंगा आणि राष्ट्रगीत

इस्लामाबाद : पाकिस्तान सरकारची वेबसाईट गुरुवारी हॅक करण्यात आली.

4 वर्षांच्या चिमुरड्याचं डोकं मसाज टेबलमध्ये अडकलं
4 वर्षांच्या चिमुरड्याचं डोकं मसाज टेबलमध्ये अडकलं

बीजिंग : स्पामध्ये चिमुकल्यांना सोबत घेऊन जाणाऱ्या पालकांनी

ऑस्ट्रेलियात घरात घुसलेला चोर शॅम्पेन पिऊन झोपी गेला
ऑस्ट्रेलियात घरात घुसलेला चोर शॅम्पेन पिऊन झोपी गेला

कॅनबेरा : ऑस्ट्रेलियाच्या एका शहरात एका घरात चोर घुसला. मात्र चोरी न

जगातील उंच रहिवाशी इमारतींपैकी 79 मजली 'द टॉर्च'ला आग
जगातील उंच रहिवाशी इमारतींपैकी 79 मजली 'द टॉर्च'ला आग

दुबई : जगातील सर्वात उंच रहिवाशी इमारतींपैकी एक असलेल्या दुबईतील

काळजाचा ठोका चुकवणारी विमान अपघाताची दृश्य कॅमेऱ्यात कैद
काळजाचा ठोका चुकवणारी विमान अपघाताची दृश्य कॅमेऱ्यात कैद

कॅलिफोर्निया (अमेरिका) : अमेरिकेतल्या कॅलिफॉर्नियामध्ये 30 जून रोजी

शांतता हवी असेल, तर डोकलाममधून सैन्य हटवा, चीनचा इशारा
शांतता हवी असेल, तर डोकलाममधून सैन्य हटवा, चीनचा इशारा

बिजिंग : डोकलाम मुद्यावरून भारत-चीनच्या सैन्यामधील तणावात