फ्रान्समध्ये कायद्याने सेक्स-सहमतीचं वय 13 वर्षांवर?

शारीरिक संबंधांसाठी संमती देण्याचं वय 15 वर्ष करण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे.

फ्रान्समध्ये कायद्याने सेक्स-सहमतीचं वय 13 वर्षांवर?

पॅरिस : शारीरिक संबंधांसाठी सहमती देण्याचं वय 13 वर्षांवर नेण्याबाबत फ्रान्समध्ये चर्चा सुरु आहे. फ्रान्स सरकारने पहिल्यांदाच शरीरसंबंधांच्या सहमतीसाठी किमान वय निश्चित करण्याचा निर्णय घेतला आहे.

याच पार्श्वभूमीवर कायदेमंत्री निकोल यांनी केलेल्या वक्तव्याने वाद उफाळला आहे. सेक्सच्या संमतीचं वय कायद्याने 13 वर्ष करावं, असं निकोल म्हणाले. यावर स्त्रीवादी संघटनांनी जोरदार विरोध केला. शारीरिक संबंधांसाठी संमती देण्याचं वय 15 वर्ष करण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे.

गेल्या आठवड्यात, दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये 11 वर्षांच्या मुलींसोबत शारीरिक संबंध ठेवणाऱ्या पुरुषांवर बलात्काराचा खटला चालवण्यास कोर्टाने नकार दिला होता. कारण दोन्ही घटनांमध्ये जबरदस्ती सेक्स झाल्याचं सिद्ध झालं नव्हतं.

अशा घटनांमुळेच सेक्ससाठी सहमतीचं किमान वय निश्चित करण्याचा निर्णय फ्रान्स सरकारने घेतला आहे. तसं झाल्यास, कायद्यानुसार किमान वयाखालील मुलगा किंवा मुलीसोबत सहमतीने ठेवलेले शारीरिक संबंधही जबरदस्ती (बलात्कार) मानले जातील.

फ्रान्समध्ये 15 वर्षांखालील व्यक्तीशी सेक्स करणं अवैध आहे. मात्र हे शारीरिक संबंध जबरदस्ती असल्याचं सिद्ध झालं, तरच बलात्काराचा खटला दाखल होऊ शकतो.

विश्व शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Age of consent for sex may be reduced to 13 in France latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV