भारत-श्रीलंकेदरम्यानचा ‘रामसेतू’ मानवनिर्मितच, अमेरिकेच्या सायन्स चॅनेलचा दावा

भारत आणि श्रीलंका दरम्यान जोडणारा रामसेतू मानवनिर्मित असल्याच्या शक्यतेवर आता अमेरिकेच्या विज्ञानविषयक वाहिनीने शिक्‍कामोर्तब केलं आहे

भारत-श्रीलंकेदरम्यानचा ‘रामसेतू’ मानवनिर्मितच, अमेरिकेच्या सायन्स चॅनेलचा दावा

वॉशिंग्टन  : भारत आणि श्रीलंका दरम्यान जोडणारा रामसेतू मानवनिर्मित असल्याच्या शक्यतेवर आता अमेरिकेच्या विज्ञानविषयक वाहिनीने शिक्‍कामोर्तब केलं आहे. ‘नासा’च्या उपग्रहांनी घेतलेल्या छायाचित्रांचा पुरावा यासाठी ग्राह्य धरण्यात आला आहे.

अमेरिकेतील एका विज्ञान विषयक 'सायन्स चॅनेल'च्या कार्यक्रमातून भारत आणि श्रीलंकेदरम्यानचा प्राचीन रामसेतू पुन्हा प्रकाशझोतात आला. या कार्यक्रमात भारत आणि श्रीलंकादरम्यानचा रामसेतू प्राचीन काळापासून अस्तित्वात असल्याचं मान्य करण्यात आलं. तसेच हा सेतू नैसर्गिक नसून, याचे बांधकाम मनुष्यांनी केले असल्याचा दावा यातून करण्यात आला आहे.

या कार्यक्रमात, रामायणात सांगण्यात येत असलेला रामसेतू खरा आहे का, असा प्रश्‍न विचारण्यात आला होता. यावर वैज्ञानिकांनी होकारार्थी उत्तर दिलं. तसेच याबाबत ‘नासा’च्या उपग्रहांद्वारे घेतलेल्या छायाचित्रांच्या पडताळणीत भारत-श्रीलंका या दोन देशांमध्ये 30 मैल लांबपर्यंत समुद्रात दगड आढळून आला असल्याचंही स्पष्ट करण्यात आलं.

दरम्यान, विज्ञान वाहिनीच्या दाव्यानंतर भारतात राजकारणही तापलं आहे. केंद्रीय कायदेमंत्री रवीशंकर प्रसाद यांनी गेली हजारो वर्षे भारतीयांच्या कणाकणात श्रीराम वसला असल्याची प्रतिक्रिया दिली. तसेच, रामसेतू काल्पनिक मानणार्‍या काँग्रेसने आता आपली भूमिका स्पष्ट करावी, असा टोलाही लागवला.

तर या विषयावरून लोकांना भ्रमित करण्याचा प्रयत्न भाजप करीत आहे, अशी टीका काँग्रेसचे नेते राजीव शुक्‍ला यांनी केली. रामसेतू हे ऐतिसासिक तथ्य असून, काँग्रेसला ते मान्य आहे, असे त्यांनी सांगितलं.

व्हिडीओ पाहा

विश्व शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: americans most popular science channel says ram setu was man made
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV