आँग सान सू क्यी यांचा ‘फ्रीडम ऑफ ऑक्सफोर्ड’ पुरस्कार काढून घेतला

सिटी ऑफ ऑक्सफोर्डकडून दिला जाणारा ‘फ्रीडम ऑफ ऑक्सफोर्ड’ पुरस्कार म्यानमारच्या सर्वोच्च नेत्या आँग सान सू क्यी यांच्याकडून काढून घेतला आहे. म्यानमारमधील रोहिंग्या समाजाच्या दुरवस्थेमुळे त्यांच्याकडून हा पुरस्कार काढून घेण्यात आला आहे.

आँग सान सू क्यी यांचा ‘फ्रीडम ऑफ ऑक्सफोर्ड’ पुरस्कार काढून घेतला

लंडन :  सिटी ऑफ ऑक्सफोर्डकडून दिला जाणारा ‘फ्रीडम ऑफ ऑक्सफोर्ड’ पुरस्कार म्यानमारच्या सर्वोच्च नेत्या आँग सान सू क्यी यांच्याकडून काढून घेतला आहे. म्यानमारमधील रोहिंग्या समाजाच्या दुरवस्थेमुळे त्यांच्याकडून हा पुरस्कार काढून घेण्यात आला आहे.

आँग सान सू क्यी यांना 1997 मध्ये म्यानमारमध्ये लोकशाहीच्या रक्षणासाठी उभारलेल्या संघर्षासाठी ‘फ्रीडम ऑफ ऑक्सफोर्ड’ पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं. पण सोमवारी सिटी ऑफ ऑक्सफोर्ड परिषदेने एक प्रस्ताव एकमताने मंजूर करुन, त्यांच्याकडून हा पुरस्कार काढून घेतला.

ऑक्सफोर्ड सिटी काऊन्सिलचे नेते बॉब प्राईस यांनी परिषदेच्या या निर्णयाचं स्वागत केलं असून, स्थानिक प्रशासनासाठी हे अनपेक्षित पाऊल असल्याचंही यावेळी म्हटलं आहे. तसेच सिटी काऊंसिलची 27 नोव्हेंबर रोजी एक बैठक होणार असून, या बैठकीत आँग सान सू क्यी यांच्याकडून औपचारिकरित्या हा पुरस्कार परत घेतला जाईल.

शांततेचा नोबेल पुरस्कार विजेत्या आँग सान सू क्यी यांचं आणि ‘सिटी ऑफ ऑक्सफोर्ड’चं अतूट नात आहे. त्यांचे आपल्या कुटुंबियांसोबत पार्क सिटी टाऊनमध्ये काहीकाळ वास्तव्य होतं. तसेच 1964-67 दरम्यान त्यांनी सेंट ह्यू कॉलेजमधून शिक्षण घेतलं.

दरम्यान, सिटी काऊन्सिलच्या या निर्णयापूर्वीच सेंट ह्यू कॉलेजनेही आँग सान सू क्यी यांचा फोटो महाविद्यालयातून काढून टाकला आहे. त्यांचा फोटो काढण्यापाठीमागे म्यांनमारमधील रोहिंग्या मुस्लीमांच्या दुरवस्थेचं प्रमुख कारण असल्याचं मागलं जात आहे.

म्यांनमारमध्ये सैन्याच्या कारवाईमुळे जवळपास 5 लाखा रोहिंग्या मुस्लीमांना देशातून विस्थापित व्हावं लागलं आहे.

विश्व शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV