पॅरासिलिंग जीवावर, अवघ्या 18 सेकंदात समुद्रात पडून मृत्यू

थायलंडमध्ये पॅरासिलिंग करताना एका ऑस्ट्रेलियन नागरिकाचा मृत्यू झाला आहे. थायलंडमधल्या फुकेट या शहरात 71 वर्षीय रॉजर हुसै विसीबली आपल्या पत्नीसह पॅरासिलिंग करण्यासाठी गेले होते.

By: | Last Updated: 14 Jul 2017 03:32 PM
पॅरासिलिंग जीवावर, अवघ्या 18 सेकंदात समुद्रात पडून मृत्यू

थायलंडमध्ये पॅरासिलिंग करताना एका ऑस्ट्रेलियन नागरिकाचा मृत्यू झाला आहे. थायलंडमधल्या फुकेट या शहरात  71 वर्षीय रॉजर हुसै विसीबली आपल्या पत्नीसह पॅरासिलिंग करण्यासाठी गेले होते.

मात्र आकाशात झेपावल्यानंतर अवघ्या 18 सेकंदांमध्ये रॉजर हे समुद्रात कोसळले.

त्यांना तातडीनं जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आलं, पण उपचाराआधीच त्यांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.

याप्रकरणी निष्काळजीपणाचा गुन्हा नोंदवून पोलिसांनी 2 जणांना अटक केली आहे.

हा सर्व अपघात समुद्र किनाऱ्यावर उपस्थित असलेल्या पर्यटकांनी शूट केला. रॉजर यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नीनं तो सोशल मीडियावर पोस्ट केला.

विश्व शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
अधिक माहिती: Australian tourist thailand
First Published:
LiveTV