अफगाणिस्तानच्या शिया मशिदीत स्फोट, 20 जणांचा मृत्यू

अफगाणिस्तानच्या शिया मशिदीत शक्तिशाली स्फोट झाला आहे. यात 20 जणांना आपला जीव गमावावा लागला आहे. इराणच्या सीमेला लागून असलेल्या अफगाणिस्तानातील शिया मशिदीत स्फोट झाला.

अफगाणिस्तानच्या शिया मशिदीत स्फोट, 20 जणांचा मृत्यू

काबुल : अफगाणिस्तानच्या शिया मशिदीत शक्तिशाली स्फोट झाला आहे. यात 20 जणांना आपला जीव गमावावा लागला आहे. इराणच्या सीमेला लागून असलेल्या अफगाणिस्तानातील शिया मशिदीत स्फोट झाला.

हेरात शहरातील जवादिया मशिदीत मंगळवारी संध्याकाळी हा स्फोट घडवण्यात आला. स्फोटात मृत्यू झालेल्या 20 जणांचे मृतदेह हॉस्पिटलमध्ये आणण्यात आलेत, असं हॉस्पिटलमधील डॉ. मोहम्मद रफीक शेहरझाद यांनी सांगितलं.

दरम्यान नुकताच 31 जुलैला काबुलमधील इराकच्या दूतावासावर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. अफगाणिस्तानमध्ये स्फोटांचं सत्र सुरुच असून यापूर्वी भारत-अफगाणिस्तानच्या मैत्रीचं प्रतिक असलेल्या सलमा धरणावर तालिबान्यांनी हल्ला केला होता.

विश्व शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV