ना डिझेलवर, ना एलपीजीवर, बस धावणार चक्क कॉफीवर

लंडन शहरातल्या सार्वजनिक वाहतुकीचा मोठा आधार असलेल्या बसमध्ये इंधन म्हणून चक्क कॉफीच्या चोथ्यापासून तयार करण्यात आलेल्या तेलाचा वापर केला जात आहे.

By: | Last Updated: 22 Nov 2017 04:49 PM
ना डिझेलवर, ना एलपीजीवर, बस धावणार चक्क कॉफीवर

लंडन : कॉफी प्यायल्यानंतर फ्रेश वाटतं, उत्साही वाटतं, असं आपण अनेकदा म्हणतो. पण आता हिच कॉफी इंधन म्हणून वापरली जाते, असं तुम्हाला कुणी सांगितलं तर, तुमचाही विश्वास बसणार नाही. पण लंडनमध्ये हे खरंच होतं आहे.

लंडन शहरातल्या सार्वजनिक वाहतुकीचा मोठा आधार असलेल्या बसमध्ये इंधन म्हणून चक्क कॉफीच्या चोथ्यापासून तयार करण्यात आलेल्या तेलाचा वापर केला जात आहे.

सध्या प्रायोगिक तत्वावर ही मोहीम लंडन शहरात सुरु करण्यात आली. जर हा प्रयोग यशस्वी झाला, तर हेच इंधन इतर वाहनांसाठीही वापरता येईल, अशी आशा अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

लंडनमधील ‘बायो-बीन लिमिटेड’ या कंपनीने हा प्रयोग राबवला आहे. कंपनीने एका वर्षात कॉफीच्या वेस्टपासून बनवलेल्या तेलाचा साठा बस चालवण्यासाठी तयार करुन ठेवला आहे.

कंपनीच्या अहवालानुसार, लंडनमधील नागरिकांच्या कॉफी सेवनानंतर उरलेल्या चोथ्यामधून वर्षभरात दोन लाख टन कचरा तयार होतो. हाच कचरा कंपनीने कॉफीची दुकाने आणि कॉफीवर प्रक्रिया करणाऱ्या कारखान्यांकडून विकत घेऊन, त्यापासून तेल निर्मिती केली आहे.

कॉफीच्या कचऱ्याचे हे तेल बी 20 या जैव इंधनामध्ये मिसळले जाते. अशा प्रकारे टाकाऊ कचऱ्यापासून आपण इंधन निर्मिती करु शकतो, याचे हे सर्वोत्तम उदाहरण असल्याचे बायो-बीनचे संस्थापक ऑर्थर केय यांनी दावा केला आहे.

सध्या, हे इंधन ‘ट्रान्सपोर्ट फॉर लंडन’ने (टीएफएल) कमी धूर उत्सर्जित करणाऱ्या आणि जैव इंधनावर चालणाऱ्या बसेसमध्ये वापरण्याला प्राधान्य दिलं आहे. या पर्यावरणपूरक उपक्रमाचे लंडनमधील नागरिकांकडून स्वागत होत आहे.

विश्व शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: bus will run on coffee in London latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV