कॅलिफोर्नियात भीषण वणवा, 7 हजार हेक्टर जंगल भस्मसात

अमेरिकेतील कॅलिफोर्निया इतिहासातील सर्वात मोठया आगीत होरपळून निघालं आहे.

कॅलिफोर्नियात भीषण वणवा, 7 हजार हेक्टर जंगल भस्मसात

वॉशिंग्टन: अमेरिकेतील कॅलिफोर्निया इतिहासातील सर्वात मोठया आगीत होरपळून निघालं आहे.

वणव्यामुळे लागलेली आग इतकी मोठी आहे की, या आगीत जवळपास 7 हजार हेक्टर जंगल जळून खाक झालं आहे तर 1500 घरं भस्मसात झाली आहेत.

अनेक मराठी कुटुंबानाही या आगीचा फटका बसला आहे.  वणव्यात 10 जणांचा मृत्यू तर 100 जण जखमी झाले आहेत.

कडक ऊन आणि वेगवान वाऱ्यांमुळे हा वणवा कॅलिफॉर्निय़ातल्या 7 जिल्ह्यांमध्ये पसरला. सध्या या सर्व भागातला विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला आहे, तर काही राष्ट्रीय महामार्ग बंद करण्यात आले आहेत.

अॅनहेम जिल्ह्यातील नागरिकांना घरं खाली करण्याचे आदेश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.

विश्व शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV