पोटच्या 13 मुलांना बेडला बांधलं, अमेरिकेत दाम्पत्याला अटक

दाम्पत्याच्या 10 वर्षांच्या मुलीनं रविवारी सकाळी कसाबसा घरातून पळ काढला आणि पालकांनी केलेला छळ, भावंडांची परिस्थिती पोलिसांना सांगितली

पोटच्या 13 मुलांना बेडला बांधलं, अमेरिकेत दाम्पत्याला अटक

वॉशिंग्टन : पोटच्या 13 मुलांना ओलिस ठेवून अमानुष छळ करणाऱ्या पालकांना अटक करण्यात आली आहे. अमेरिकेतील कॅलिफोर्नियात ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

कॅलिफोर्नियातील पॅरिस भागात राहणारा 57 वर्षीय डेव्हिड तुर्पिन आणि 47 वर्षीय लुईस तुर्पिन या दाम्पत्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या.

दाम्पत्याच्या 10 वर्षांच्या मुलीनं रविवारी सकाळी कसाबसा घरातून पळ काढला आणि पालकांनी केलेला छळ, भावंडांची परिस्थिती पोलिसांना सांगितली. मुलीच्या तक्रारीनंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले.

घरात त्यांना इतर 12 मुलांना अंधाऱ्या खोलीत, बेडला साखळ्यांनी बांधून ठेवल्याचं धक्कादायक चित्र दिसलं. घरात दुर्गंधी पसरली होती. त्यानंतर पोलिसांनी तुर्पिन दाम्पत्याला अटक केली.

America Couple Turpin 2

सर्वात धाकट्या मुलाचं वय दोन वर्ष, तर सर्वात मोठ्या मुलाचं वय 29 वर्ष आहे. सात मुलांचं वय 18 वर्षांपेक्षा जास्त आहे. सर्वच मुलं कुपोषित झाली होती.

तुर्पिन दाम्पत्य आपल्या मुलांना अशी वागणूक का देत होतं, याचा शोध पोलिस घेत आहेत.

विश्व शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: California : siblings found tied to bed in Turpin family’s home latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV