चीनच्या राष्ट्रगीतावेळी उभं राहिलं नाही, तर 3 वर्षांचा तुरुंगवास

भारतात राष्ट्रगीतावेळी उभं राहण्यावरुन वाद सुरु असतानाच, तिकडे चीन मात्र राष्ट्रगीत आणि राष्ट्रध्वजाचा अवमान करणाऱ्यांना कठोर शिक्षा करण्याच्या विचारात आहे. चीनच्या संसदेत राष्ट्रगीत, राष्ट्रध्वजाच्या अवमानकर्त्याला तीन वर्षे तुरुंगवासाची शिक्षा देण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे.

By: | Last Updated: > Wednesday, 1 November 2017 8:54 PM
china may give sentence over national anthem insult

प्रातिनिधिक फोटो

बिजिंग : भारतात राष्ट्रगीतावेळी उभं राहण्यावरुन वाद सुरु असतानाच, तिकडे चीन मात्र राष्ट्रगीत आणि राष्ट्रध्वजाचा अवमान करणाऱ्यांना कठोर शिक्षा करण्याच्या विचारात आहे. चीनच्या संसदेत राष्ट्रगीत, राष्ट्रध्वजाच्या अवमानकर्त्याला तीन वर्षे तुरुंगवासाची शिक्षा देण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे.

‘सिन्हुआ’ या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, नॅशनल पिपल्स काँग्रेस (पीपीसी) च्या स्थायी समितीच्या द्वैमासिक सत्रात याबाबतचा एक प्रस्ताव सादर करण्यात आला. यामध्ये चिनी राष्ट्रगीत आणि राष्ट्रध्वाजाचा अवामानकरर्त्याला तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्याची शिफारस आहे.

वास्तविक, सद्या राष्ट्रगीताचा अवमान केल्यास 15 दिवसांचा तुरुंगवास द्यावा. तसेच त्याविरोधात गुन्हेगारी स्वरुपाचे खटले चालवावेत, अशी तरतूद करण्यात आली आहे.

या प्रस्तावावर एनपीसीच्या स्थायी समितीचे विधी प्रकरणाच्या आयोगातील सदस्य वांग चाओयींग यांनी सांगितलं कि, “गुन्हेगारी स्वरुपाच्या प्रकरणांमध्ये राष्ट्रध्वज, आणि राष्ट्रीय प्रतिकांचा अपमान करण्याला दंडात्मक कारवाईची तरतूद आहे. त्याचप्रमाणे राष्ट्रगीताचा अपमान करणाऱ्याला शिक्षेची तरतूद कायद्यात समाविष्ट करण्यात आली आहे.”

या नव्या कायद्यामुळे राष्ट्रगीताचा अपमान केल्यास, त्या व्यक्तीकडून राजकीय अधिकार काढून घेऊन तत्काळ अटक करणे, नजरकैद आणि तीन वर्षांच्या तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे.

World News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:china may give sentence over national anthem insult
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

भारतात माझ्या जिवाला धोका : विजय मल्ल्या
भारतात माझ्या जिवाला धोका : विजय मल्ल्या

लंडन : विजय मल्ल्याविरोधातील प्रत्यर्पण केसवर सोमवारी यूकेच्या

जेव्हा 20 वर्षांपूर्वी पार्किंगमध्ये 'विसरलेली' कार सापडते...
जेव्हा 20 वर्षांपूर्वी पार्किंगमध्ये 'विसरलेली' कार सापडते...

फ्रँकफर्ट : तुम्ही कधी कार आणल्याचं विसरुन थेट घरी गेला आहात का? असं

ट्रेन 20 सेकंद लवकर सुटली, जपानी रेल्वे प्रशासनाची माफी
ट्रेन 20 सेकंद लवकर सुटली, जपानी रेल्वे प्रशासनाची माफी

टोकियो/मुंबई : भारतामध्ये एखादी ट्रेन पाच-दहा मिनिटं, अर्धा तास,

या प्रश्नाचं उत्तर देऊन मानुषी छिल्लर मिस वर्ल्ड बनली!
या प्रश्नाचं उत्तर देऊन मानुषी छिल्लर मिस वर्ल्ड बनली!

बीजिंग : भारताच्या मानुषी छिल्लरने 2017 चा मिस वर्ल्ड जिंकून इतिहास

भारत सर्वाधिक वेळा मिस वर्ल्डचा किताब मिळवणाऱ्या देशांच्या यादीत
भारत सर्वाधिक वेळा मिस वर्ल्डचा किताब मिळवणाऱ्या देशांच्या यादीत

बीजिंग : भारताच्या मानुषी छिल्लरने 2017 चा मिस वर्ल्ड जिंकून इतिहास

भारताच्या मानुषी छिल्लरला यंदाच्या विश्वसुंदरीचा किताब
भारताच्या मानुषी छिल्लरला यंदाच्या विश्वसुंदरीचा किताब

बिजिंग : भारताची 21 वर्षीय मानुषी छिल्लरने 2017 चा मिस वर्ल्डचा किताब

कॅलिफोर्नियात दुकानात दरोडा, 21 वर्षीय भारतीय विद्यार्थ्याची हत्या
कॅलिफोर्नियात दुकानात दरोडा, 21 वर्षीय भारतीय विद्यार्थ्याची हत्या

कॅलिफोर्निया : कॅलिफोर्नियातील सुपरमार्केटमध्ये झालेल्या

झिम्बाब्वेमध्ये राजकीय अराजक, लष्करी राजवटीची चिन्हं
झिम्बाब्वेमध्ये राजकीय अराजक, लष्करी राजवटीची चिन्हं

हरारे : झिम्बाब्वेमध्ये राजकीय भूकंप झाला असून, बुधवारी लष्कराने

फ्रान्समध्ये कायद्याने सेक्स-सहमतीचं वय 13 वर्षांवर?
फ्रान्समध्ये कायद्याने सेक्स-सहमतीचं वय 13 वर्षांवर?

पॅरिस : शारीरिक संबंधांसाठी सहमती देण्याचं वय 13 वर्षांवर

इंदूरच्या सुयश दीक्षितकडून नव्या देशाची निर्मिती
इंदूरच्या सुयश दीक्षितकडून नव्या देशाची निर्मिती

मुंबई : भारतातील एका तरुणाने चक्क स्वतंत्र देशाची निर्मिती केली