चीनच्या 'मुक्तीसेने'त मोठी कपात, चिनी वृत्तपत्राची माहिती

चीनच्या 'मुक्तीसेने'त मोठी कपात, चिनी वृत्तपत्राची माहिती

बिजिंग : सध्या चीन जगातला सर्वात मोठा लष्करी सामर्थ्य असलेला देश म्हणून ओळखला जातो. पण त्याच देशाने आपल्या लष्करी सामर्थ्यात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. चीनच्या अधिकृत PAL डेली या वृत्तपत्राने याबाबतची बातमी प्रकाशित केली आहे.

सध्या चीनच्या PAL (People's Liberation Army) म्हणजे मुक्तीसेनेत 23 लाख जवान असून, यात 13 लाख जवानांची कपात करुन ती संख्या 10 लाखांवर आणण्यात येणार असल्याचं चिनी वृत्तपत्रानं सांगितलं आहे. चीनची मुक्तीसेना जवानांची संख्या कमी करुन, नौदलाचं सामर्थ्य वाढवण्यासोबतच शस्त्रसाठा वाढवण्यावर भर देणार आहे.

पीएएलच्या चिनी सोशल साईटवरील 'वुईचॅट' अकाऊंट जुन झेंगपिंग स्टूडिओवर लष्करातील मुलभूत बदलांसदर्भात एक लेख प्रकाशित करण्यात आला आहे. यात चिनी लष्कराच्या जुन्या संरचनेत मुलभूत बदल करण्यात येणार असल्याचं सांगितलं आहे.

चीनचं सामरिक लक्ष्य आणि सुरक्षेच्या आधारावर हे बदल अवलंबून असतील, असंही या रिपोर्टमधून सांगण्यात येत आहे. यापूर्वी पीएलएचा फोकस जमिनीवरील युद्ध आणि देशाअंतर्गत सुरक्षावर केंद्रीत केला होता. यातही मुलभूत सुधारणांबद्दल सांगण्यात आलं होतं.

पीएलएनं आपल्या लष्करी सामर्थ्यात इतक्या मोठ्याप्रमाणात कपात करण्याची पहिलीच वेळ असल्याचंही त्यानं स्पष्ट केलं आहे. लष्करी सामर्थ्य कमी केल्यानंतर पीएलए नौदल, पीएलए स्ट्रॅटजिक सपोर्ट फोर्स आणि पीएलए रॉकेट फोर्समधील जवानांची संख्या वाढवण्यात येणार असल्याचं यातून सांगिण्यात आलंय. पण पीएलए वायूदलाचतील जवानांच्या संख्येत कोणतीही कपात करण्यात येणार नसल्याचं पीएलएनं स्पष्ट केलंय.

दरम्यान, चीनच्या संरक्षण मंत्रालयानं दिलेल्या आकडेवारीनुसार, पीएलए सैन्य दलात 2013 मध्ये 8.50 लाख सैनिक होते. पण पीएलएनं याबाबत अधिकृत आकडेवारी कधीही प्रसिद्ध केली नाही.

विश्व शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV