'दंगल' आवडला, चीनच्या राष्ट्रपतींची मोदींकडे प्रतिक्रिया

By: | Last Updated: > Friday, 9 June 2017 9:08 PM
chines president said to pm modi i watched dangal movie and i liked it very much

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या शांघाय सहयोग संघटनेच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी कझाकस्तानच्या दौऱ्यावर आहेत. या दरम्यान पंतप्रधान मोदी आणि चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांची भेट झाली.

या भेटीमध्ये दोन्ही देशातील संबंध आणि व्यापारावर महत्त्वाची चर्चा करण्यात आली. या शिवाय दोन्ही देशांमध्ये सांस्कृतिक सहयोग वाढवण्याबाबतही चर्चा करण्यात आली.

‘दोन्ही देशांमध्ये सांस्कृतिक सहयोगाबाबतही सविस्तर चर्चा झाली. यावेळी शी जिनपींग यांनी दंगल सिनेमा चीनमध्ये चांगली कमाई करत असल्याचं सांगितलं. त्यांनी स्वतः हा सिनेमा पाहिला आणि तो त्यांना आवडला,’ अशी माहिती परराष्ट्र सचिव एस जयशंकर यांनी दिली.

भारत शांघाय सहयोग संघटनेचा औपचारिकपणे सदस्य बनला आहे. भारताव्यतिरीक्त पाकिस्तानलाही आज एससीओची सदस्यता मिळाली आहे. याआधी चीन, रशिया, कझाकस्तान, किर्गिजस्तान, उज्बेकिस्तान आणि ताजिकिस्तान या संघटनेचे सदस्य होते.

सुपरस्टार आमिर खानचा दंगल सिनेमा भारतासह जगभरात विक्रमी कमाई केल्यानंतर चीनमध्येही रिलीज करण्यात आला आहे. चीनमध्येही या सिनेमाला प्रेक्षकांनी मोठी पसंती दिली आहे.

First Published:

Related Stories

अभिनेता अर्शद वारसीच्या गुडघ्याला दुखापत
अभिनेता अर्शद वारसीच्या गुडघ्याला दुखापत

मुंबई : बॉलिवूड अभिनेता अर्शद वारसीच्या गुडघ्याला दुखापत झाली आहे.

... म्हणून आमीर खानने नाक आणि कान टोचलं!
... म्हणून आमीर खानने नाक आणि कान टोचलं!

मुंबई : बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खान सध्या दंगल

'ट्युबलाईट'नंतर सलमान-शाहरुख मोठ्या पडद्यावर पुन्हा एकत्र?
'ट्युबलाईट'नंतर सलमान-शाहरुख मोठ्या पडद्यावर पुन्हा एकत्र?

मुंबई : शाहरुखसोबत पूर्ण लांबीचा चित्रपट करण्याचा कुठलाही इरादा

मालेगावात सलमानच्या चाहत्यांनी थिएटरमध्येच फटाके फोडले!
मालेगावात सलमानच्या चाहत्यांनी थिएटरमध्येच फटाके फोडले!

मालेगाव : अभिनेता सलमान खानच्या ‘ट्युबलाईट’ सिनेमाचा शो सुरु

‘वळू’ सिनेमातील ‘डुरक्या’चा मृत्यू
‘वळू’ सिनेमातील ‘डुरक्या’चा मृत्यू

सांगली : संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रियता मिळवलेल्या ‘वळू’

शिवगामीसाठी केलेल्या मागण्या उघड, श्रीदेवी राजमौलींवर नाराज
शिवगामीसाठी केलेल्या मागण्या उघड, श्रीदेवी राजमौलींवर नाराज

मुंबई : बहुचर्चित बाहुबली चित्रपटात भूमिका करण्यासाठी हृतिक रोशन

जन्मदिन विशेष : आर डी बर्मन यांना 'पंचम' हे नाव कसं मिळालं?
जन्मदिन विशेष : आर डी बर्मन यांना 'पंचम' हे नाव कसं मिळालं?

मुंबई : भारतीय चित्रपटसृष्टीतील जादूगार संगीतकार आर. डी. बर्मन

'दंगल'ची जगभरात 2000 कोटींची कमाई
'दंगल'ची जगभरात 2000 कोटींची कमाई

मुंबई : अभिनेता आमिर खानच्या ‘दंगल’चा जगभरात धुमाकूळ सुरु आहे.

VIDEO : काजोल-धनुषची जुगलबंदी, 'व्हीआयपी 2' चा ट्रेलर
VIDEO : काजोल-धनुषची जुगलबंदी, 'व्हीआयपी 2' चा ट्रेलर

मुंबई : काजोल आणि धनुष यांची भूमिका असलेल्या ‘वेलै इल्ला