चीनने पुन्हा डोकं वर काढलं, डोकलाममध्ये सैन्य वाढवलं?

आमच्या भागात आमच्या सैन्याची उपस्थिती हा वादाचा मुद्दा असू शकत नाही. आमच्या भूमीचं आम्ही रक्षण करत आहोत, असं चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं आहे.

By: | Last Updated: > Saturday, 7 October 2017 11:20 AM
Chinese building road in Doklam

नवी दिल्ली: डोकलामप्रकरण शांत होत असतानाच, पुन्हा एकदा चीनने डोकं वर काढलं आहे. डोकलाम आमचाच भाग आहे, अशी री पुन्हा एकदा चीनने ओढली आहे.

आमच्या भागात आमच्या सैन्याची उपस्थिती हा वादाचा मुद्दा असू शकत नाही. आमच्या भूमीचं आम्ही रक्षण करत आहोत, असं चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं आहे.

चीनने वादग्रस्त डोकलाम भागात मोठ्या प्रमाणात सैन्य तैनात केल्याचं सांगण्यात येत आहे. यापूर्वी भारत आणि चीनी सैन्यादरम्यान 73 दिवस इथेच धुसफूस सुरू होती.

भारत-चीन वादाचं नेमकं कारण असलेलं डोकलामचं ‘ए’ टू ‘झेड’

मात्र 28 ऑगस्टला दोन्ही देशांनी आपलं सैन्य हटवण्याचा निर्णय घेतला होता. हा निर्णय म्हणजे भारताच्या व्यूहरचनेचा विजय असल्याचं त्यावेळी बोललं जात होतं.

भारताच्या व्यूहरचनेचा विजय, डोकलामप्रश्नी मोठं यश

मात्र आता पुन्हा एकदा चीन डोकलामध्ये हळूहळू आपलं सैन्य वाढवत आहे.

पण डोकलाममध्ये अशी कोणतीही हालचाल होत असल्याचं वृत्त भारताने फेटाळलं आहे.

काय आहे डोकलाम वाद?

‘डोकलाम’ भारत-चीन-भूतानचं ट्रायजंक्शन

सध्या सिक्किममध्ये भारत-चीनदरम्यान 220 किमीची सीमा आहे. यातील सर्व भागात शांततेचं वातावरण आहे. पण ज्या भागात चीन आणि भारताची सीमा भूतानला जोडली आहे, त्या भागावरुन उभय देशांमध्ये तणावाची परिस्थिती आहे. भारत-भूतान दरम्यान सिक्किममध्ये 32 किमीची सीमा रेषा आहे. जवळपास 50 वर्षांपूर्वी म्हणजे 1967 मध्ये भारतीय लष्कराने सिक्किममध्ये चीनी सैन्याला धुळ चारली होती. त्यानंतर चीनकडून सिक्किमच्या भागात कधीही घुसखोरी झाली नाही. पण सध्या या तिन्ही देशांचं ट्रायजंक्शन असलेल्या डोकलाममध्ये तणावाची परिस्थिती आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?

चीनने जेव्हा चुंबी खोऱ्यात याटुंगमध्ये डोकलाम परिसरात रस्ते बांधणीचं काम हाती घेतलं, त्यावेळी भारतानं त्याचा कडाडून विरोध केला. पण चीननं या विरोधाला वाटाण्याच्या अक्षता दाखवल्या. म्हणून या भागावर लक्ष ठेवण्यासाठी भारतानं दोन बंकर उभारले. पण चिनी सैन्यानं भारताचे हे दोन्ही बंकर उद्ध्वस्त केली. त्यानंतर भारतीय लष्कराने आपली ‘रिइनफोर्समेंट’ म्हणजे लष्कराची एक मोठी तुकडी या भागात तैनात केली, त्यानंतर दोन्ही देशातील सैन्यात तणाव वाढला.

संबंधित बातम्या :

डोकलाम वाद : सिक्कीम, अरुणाचल सीमेवर भारतानं सैन्य वाढवलं!

डोकलाम आमचाच, भूतानने चीनला तोंडावर आपटलं!

भारत-चीन वादाचं नेमकं कारण असलेलं डोकलामचं ‘ए’ टू ‘झेड’

युद्धासाठी तयार राहाचीनच्या राष्ट्रपतींचे लष्कराला आदेश

आमच्या लष्कराला हरवणं अशक्यचिनी लष्कराच्या प्रवक्त्याची दर्पोक्ती

भारत-चीन वादाचं नेमकं कारण असलेलं डोकलामचं ‘ए’ टू ‘झेड’

बिजिंगमधील राजदुतांच्या परिषदेत चीनची भारताला धमकी

…तर पाकिस्तानच्या विनंतीवर काश्मीरमध्ये सैन्य घुसवू : चीनी मीडिया

चिनी दूतावासाकडून भारतात येणाऱ्या नागरिकांसाठी ‘ट्रॅव्हल अलर्ट’ जारी

G-20 : मोदी आणि शी जिनपिंग यांची भेट, डोकलाम प्रश्नावरही चर्चा : सूत्र

चीनच्या ‘ड्रॅगन’वर भारताच्या ‘रुक्मिणी’ची नजर

सिक्कीममधून भारताने सैन्य हटवावं, चीनच्या उलट्या बोंबा

…अन्यथा 1962 पेक्षा गंभीर परिणाम भोगावे लागतील, चिनी मीडियाची पुन्हा धमकी

हिंदी महासागरात चीनच्या कुरापती, युद्धनौका तैनात

World News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:Chinese building road in Doklam
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

काबुलमध्ये मिलिट्री युनिव्हर्सिटीच्या गेटवर आत्मघातकी हल्ला
काबुलमध्ये मिलिट्री युनिव्हर्सिटीच्या गेटवर आत्मघातकी हल्ला

काबुल : अफगाणिस्तानची राजधानी काबुलमध्ये मिलिट्री

26 वर्षीय अपहृत पाकिस्तानी पत्रकाराची दोन वर्षांनी सुटका
26 वर्षीय अपहृत पाकिस्तानी पत्रकाराची दोन वर्षांनी सुटका

लाहोर : दोन वर्षांपूर्वी अपहरण झालेल्या पाकिस्तानी पत्रकार

ओमानमध्ये साजरा होणार ‘धम्मचक्र प्रवर्तन दिन’ सोहळा
ओमानमध्ये साजरा होणार ‘धम्मचक्र प्रवर्तन दिन’ सोहळा

ओमान : ओमानमध्ये 61 व्या ‘धम्मचक्र प्रवर्तन दिन’ सोहळा आयोजित

पनामा पेपर्सच्या महिला पत्रकाराची हत्या
पनामा पेपर्सच्या महिला पत्रकाराची हत्या

वलेत्ता : पनामा पेपर्समधून अनेक खळबळजनक गौप्यस्फोट करुन जगाला

जीन्समधील मलालाचा फोटो व्हायरल, ट्रोलर्सकडून पॉर्नस्टारशी तुलना
जीन्समधील मलालाचा फोटो व्हायरल, ट्रोलर्सकडून पॉर्नस्टारशी तुलना

लंडन : नोबेल पुरस्कार विजेती मलाला युसुफजईचा एक फोटो सोशल मीडियावर

सोमालियात भीषण स्फोट, तीनशेहून अधिक नागरिकांचा बळी
सोमालियात भीषण स्फोट, तीनशेहून अधिक नागरिकांचा बळी

मोगादिशू (सोमालिया) : सोमालियात झालेल्या भीषण बॉम्बस्फोटातील

कॅलिफोर्नियात भीषण वणवा, 7 हजार हेक्टर जंगल भस्मसात
कॅलिफोर्नियात भीषण वणवा, 7 हजार हेक्टर जंगल भस्मसात

वॉशिंग्टन: अमेरिकेतील कॅलिफोर्निया इतिहासातील सर्वात मोठया आगीत

'फर्स्ट लेडी' बनण्यावरुन डोनाल्ड ट्रम्प यांच्या दोन पत्नी भिडल्या
'फर्स्ट लेडी' बनण्यावरुन डोनाल्ड ट्रम्प यांच्या दोन पत्नी भिडल्या

वॉशिंग्टन : जगभरात मेलानिया ट्रम्प अमेरिकेच्या फर्स्ट लेडी म्हणून

अबुधाबीत दहा जणांना कोट्यवधींची लॉटरी, आठ भारतीयांचा समावेश
अबुधाबीत दहा जणांना कोट्यवधींची लॉटरी, आठ भारतीयांचा समावेश

अबुधाबी : अबुधाबीमध्ये आयोजित एका मेगा लकी ड्रॉमध्ये दहा जणांना

रिचर्ड थेलर यांना अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार
रिचर्ड थेलर यांना अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार

स्टॉकहोम (स्वीडन): यंदाचा अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार अमेरिकेचे