चीनमध्ये बनले तब्बल तीन हजार मीटर लांबीचे नूडल्स

चीनमध्ये तब्बल तीन हजार मीटर लांबीचे नूडल्स बनवून गिनीज बुकमध्ये रेकॉर्ड नोंदवला आहे. एका चायनिज कंपनीनं हे नूडल्स तयार केले आहेत.

चीनमध्ये बनले तब्बल तीन हजार मीटर लांबीचे नूडल्स

बिजिंग : चीनमध्ये थोडं थोडकं नाही, तर तब्बल तीन हजार मीटर लांबीचे नूडल्स बनवून गिनीज बुकमध्ये रेकॉर्ड नोंदवला आहे. एका चायनिज कंपनीनं हे नूडल्स तयार केले आहेत.

हे नूडल्स तयार करायला 40 किलो ब्रेडचं पीठ, 27 लिटर पाणी आणि अर्धा किलो मीठ इतकी सामग्री लागली आहे. विशेष म्हणजे हे नूडल्स मशिनने तयार केले नाहीत. तर हाताने तयार करण्यात आले आहेत. तसेच तब्बल 17 तास शिजवल्यानंतर हे नूडल्स तयार झाले आहेत.

तसेच, हे नूडल्स तयार झाल्यानंतर त्यात अंडं, लसूण, टोमॅटो, सॉस टाकून ते कंपनीतीलच 400 कर्मचाऱ्यांना खायला देण्यात आले.

हे नूडल्स तयार करण्याचा व्हिडीओ गिनीजने आपल्या यूट्यूब चॅनेलवर अपलोड केला असून, हा व्हिडीओ अपलोड केल्यापासून अनेकांनी पाहिला आहे.

दरम्यान, याआधी हा 548 मीटर लांबीच्या नूडल्सचा रेकॉर्ड करण्यात आला होता. जपानी शेफने 2001 मध्ये हे नूडल्स तयार केले होते. पण आज हा विक्रम चीनने मोडून काढला आहे.

व्हिडीओ पाहा

विश्व शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Chinese Has Made The Longest Noodle In The World And It’s 10,100-Feet-Long!
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV