रॅन्समवेअर अटॅक करुन जगभरात धुमाकूळ घालणाऱ्यांची निराशा

By: | Last Updated: > Tuesday, 16 May 2017 10:22 PM
cyber criminals who made ransomware virus has not got enough money

मुंबई : जगभरात सायबर हल्ला करणाऱ्यांची, ‘खोदा पहाड निकला चुहा’ अशीच काहीशी फसगत झाली.  रॅन्समवेअर सायबल हल्ला करणाऱ्या टोळीला जगभरातून फक्त 62 हजार अमेरिकन डॉलर, म्हणजे जवळपास 43 लाख रुपयांची खंडणी गोळा करता आली आहे.

आयटी तज्ज्ञांच्या मते, ज्या प्रमाणात जगभरात सायबर हल्ला करण्यात आला त्या तुलनेत खंडणीची रक्कम अगदी नगण्य आहे. सायबर क्रिमिनल रॅन्समवेअरच्या मदतीनं कॉम्प्युटर लॉक करून त्यातला डेटा डिलीट करण्याची धमकी देतात आणि त्या बदल्यात खंडणीच्या स्वरूपात मोठी रक्कम उकळतात.

प्रत्येक व्यवहारासाठी ते 300 ते 600 अमेरिकन डॉलर्सची खंडणी मागतात. मात्र सायबर क्रिमिनलचा डाव फसल्यामुळं ते भविष्यात मोठा सायबर हल्ला करण्याची शक्यता नाकारता येत नाही.

गेल्या शुक्रवारपासून रॅन्समवेअर सायबल हल्ल्याची मालिका सुरु आहे. यात बँका, रुग्णालये, खाजगी आणि सरकारी कार्यालयांना लक्ष्य करण्यात आलं आहे. हल्लेखोरांनी मायक्रोसॉफ्टची जुनी ऑपरेटिंग सिस्टम ओएसच्या कमकुवतपणाचा फायदा घेतला.

तर सोमवारी कामाचा दिवस सुरु झाल्यानंतर जगभरात जवळपास दोन लाख कंपन्या आणि नागरिकांवर सायबर हल्ला झाला. या सायबर हल्ल्यामुळे सध्या संपूर्ण जगात गोंधळ निर्माण झाला असून, रॅन्समवेअर व्हायरस नष्ट करण्यासाठी आयटी तज्ज्ञांचे प्रयत्न सुरु आहेत.

 

रॅनसमवेअरपासून बचाव कसा कराल?

  • तुम्हाला एखाद्या अनोळखी, व्यक्तीचा किंवा कंपनीचा ई-मेल आला असेल, तर तो ओपन करु नका
  • ई-मेल करणारा व्यक्ती ओळखीचा आहे, मात्र ई-मेलचा विषय दररोजपेक्षा वेगळा किंवा तुमच्या कामाशी मिळता जुळता, विस्कळीत असेल तरीही तो ई-मेल ओपन करु नये.
  • जी-मेल, याहू, हॉटमेल आणि रेडिफमेलवर तुमचे वैयक्तीक मेल ओपन करणं टाळावं.
  • पेन ड्राईव्ह, पर्सनल पेन ड्राईव्ह किंवा कंपनीच्या एक्स्टर्नल हार्ड डिस्कचा वापर टाळावा.
  • ई-कॉमर्स वेबसाईटवरुन खरेदी करताना सावधानता बाळगा
  • फेसबुक, लिंकडेन आणि ट्विटरचा वापर कमीत कमी करुन अनोळखी जाहिराती किंवा मेसेज ओपन करु नये.
  • तुमची सिस्टम हॅक झाल्याचा संशय आला, किंवा काही एरर मेसेज आल्यास तातडीने आयटी टीमशी संपर्क साधा

दरम्यान, रॅन्समवेअर संदर्भातील तक्रारींचं निवारण करण्यासाठी राज्य सरकारनं हेल्पलाईन सुरू केली आहे. नाशिकमधून ही हेल्पलाईन ऑपरेट करण्यात येत असून, आज आणि उद्या तुम्ही या सेवेचा लाभ घेत येणार आहे. त्यासाठी तुम्ही 02536631777 या क्रमांकावर कॉल करु शकता, अशी माहिती विशेष पोलीस महानिरीक्षक ब्रिजेश शिंग यांनी परिपत्रक काढून दिली आहे.

 

संबंधित बातम्या

सायबर हल्ल्यापासून वाचण्यासाठी काय कराल?

भारतातील 70 टक्के एटीएमवर सायबर हल्ला शक्य, RBI ला अलर्ट जारी

अनेक देशात सायबर हल्ला, रेनसमवेयर व्हायरसमुळे कम्प्युटर ठप्प

First Published:

Related Stories

फोर्डने तब्बल 39,315 कार परत मागवल्या
फोर्डने तब्बल 39,315 कार परत मागवल्या

मुंबई: फोर्ड इंडियानं स्टेअरिंग पॉवर होजमध्ये बिघाड असलेल्या 39,315

सॅमसंगच्या सर्वात महागड्या स्मार्टफोनचे फीचर्स लीक
सॅमसंगच्या सर्वात महागड्या स्मार्टफोनचे फीचर्स लीक

मुंबई: सॅमसंग लवकरच आपल्या Note सीरीजमधील नवा स्मार्टफोन लाँच

कोहलीची सलमानवर मात, फेसबुकवर दुसऱ्या स्थानी विराजमान!
कोहलीची सलमानवर मात, फेसबुकवर दुसऱ्या स्थानी विराजमान!

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून प्रशिक्षकासोबतच्या वादामुळे

6 जीबी रॅम, 4000 mAh बॅटरी, ऑनर 8 प्रो स्मार्टफोन भारतात लाँच
6 जीबी रॅम, 4000 mAh बॅटरी, ऑनर 8 प्रो स्मार्टफोन भारतात लाँच

मुंबई: हुआवेनं आपला नवा स्मार्टफोन ऑनर 8 प्रो लाँच केला आहे. हा

एअरटेलची नवी मान्सून ऑफर, ग्राहकांना मिळणार मोफत 4जी डेटा
एअरटेलची नवी मान्सून ऑफर, ग्राहकांना मिळणार मोफत 4जी डेटा

मुंबई : रिलायन्स जिओनं टेलिकॉम क्षेत्रात पाऊल टाकल्यानंतर

6GB RAM, 4000mAh बॅटरी, 'हुआवे'चा नवा स्मार्टफोन लाँच
6GB RAM, 4000mAh बॅटरी, 'हुआवे'चा नवा स्मार्टफोन लाँच

नवी दिल्ली : हुआवेने ऑनर ब्रँडचा ‘ऑनर 8 प्रो’ हा स्मार्टफोन

आजपासून ऑनलाईन शॉपिंग साईट्सवर धमाकेदार ऑफर्स
आजपासून ऑनलाईन शॉपिंग साईट्सवर धमाकेदार ऑफर्स

मुंबई : आजपासून ऑनलाईन शॉपिंग साईट्सवर धमाकेदार ऑफर्स देण्यात

ह्युंदाईच्या नव्या वेरना कारची पहिली झलक
ह्युंदाईच्या नव्या वेरना कारची पहिली झलक

मुंबई: ह्युंदाईनं आपल्या नव्या वेरना सेडान कारचं टीझर नुकतंट लाँच