ओमानमध्ये साजरा होणार ‘धम्मचक्र प्रवर्तन दिन’ सोहळा

जागतिक स्तरावर कार्यरत असणारी संघटना डॉ. आंबेडकर इंटरनॅशनल मिशन (AIM)च्या वतीने 20 ऑक्टोबर रोजी ‘धम्मचक्र प्रवर्तन दिन’ सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्याला भारतीय राजदूत श्री इंद्र मणी पांडे यांच्यासह भारतातील सर्व राज्यातून येणारे कामगार क्षेत्राशी संबंधित लोक उपस्थित असतील.

ओमानमध्ये साजरा होणार ‘धम्मचक्र प्रवर्तन दिन’ सोहळा

ओमान : ओमानमध्ये 61 व्या ‘धम्मचक्र प्रवर्तन दिन’ सोहळा आयोजित करण्यात आला आहे. ओमान येथील भारतीय दूतावासाच्या सभागुहात भारतीय राजदूत श्री इंद्र मणी पांडे सोहळ्याचे उद्घाटन करणार आहेत.

धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त ओमानमध्ये डॉ. आंबेडकर इंटरनॅशनल मिशन संस्थेतर्फे अक्षयी सोहळा साजरा होणार असल्याची माहिती AIM चे उपाध्यक्ष जितेंद्र एसनकर यांनी दिली.

जागतिक स्तरावर कार्यरत असणारी संघटना डॉ. आंबेडकर इंटरनॅशनल मिशन (AIM)च्या वतीने 20 ऑक्टोबर रोजी ‘धम्मचक्र प्रवर्तन दिन’ सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्याला भारतीय राजदूत श्री इंद्र मणी पांडे यांच्यासह भारतातील सर्व राज्यातून येणारे कामगार क्षेत्राशी संबंधित लोक उपस्थित असतील.

Oman 1

प्रकाश पंडित, जितेंद्र कांथे, इंजिनिअर प्रदीप ढवळे, उत्कर्ष बल्लाळ, इतर अधिकारी, तसेच भारतीय कुटुंब, जमात-ए-इस्लामी ग्रुप मस्कत, धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त आवर्जून येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. तसेच भारतीय अनिवासितांसमवेत हा सोहळा साजरा केला जाईल.

AIM चे अध्यक्ष डॉ. विद्यानंद वैद्य, प्रादेशिक रोगपरिस्थितीतज्ज्ञ आरोग्य सेवा विभागाचे संचालक आहेत. त्यांच्या अध्यक्षतेखाली AIM सातत्याने धम्म प्रासाराचे स्तुत्य काम गेली अनेक वर्ष करत आहेत.

भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार, तत्त्वज्ञान आणि चळवळीला चालना देणे, सर्व अंबेडकरी अनुयायांनी एकत्र आणणे आणि समता, बंधुता, स्वातंत्र्य आणि न्यायावर विश्वास ठेवणारा मजबूत समाज निर्माण करणे,  सामाजिक कार्यक्रमाद्वारे ओमन आणि भारतातील राहणा-या गरजू लोकांसाठी 'पे बॅक सोसायटी' या स्वरूपात थेट मदत पुरविणे आणि आंतरराष्ट्रीय आघाडीवर सांस्कृतिक ओळख वाढविणे हे AIM चे मुख्य उद्दिष्टे आहेत.

विश्व शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV