गर्भवतींसोबत डान्स करणाऱ्या डॉक्टरचा व्हिडिओ व्हायरल

गर्भवतींसोबत डान्स करुन त्यांचा ताण आणि वेदना हलक्या करण्याचा डॉ. फर्नेंडोंचा प्रयास आहे

गर्भवतींसोबत डान्स करणाऱ्या डॉक्टरचा व्हिडिओ व्हायरल

ब्राझिलीया : बाळाला जन्म देणं हे महिलांसाठी जितकं आनंददायी असतं, तितकंच वेदनादायीही. प्रत्येक आईला सोसाव्या लागणाऱ्या प्रसववेदना कमी करण्यासाठी वैद्यकीय क्षेत्रात निरनिराळे उपाय केले जातात. ब्राझिलमध्ये राहणाऱ्या एका डॉक्टरने यावर अनोखी शक्कल शोधून काढली आहे.

गर्भवतींसोबत डान्स करुन त्यांचा ताण आणि वेदना हलक्या करण्याचा डॉ. फर्नेंडोंचा प्रयास आहे. यासाठी ते गर्भवतींसोबत डान्स करतात. त्यांनी प्रेग्नंट महिलांसोबत डान्स करतानाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या डॉक्टरसाहेबांना 'डान्सिंग डॉक्टर' या नावाने ओळखलं जातं.

प्रसुतीपूर्वी नाचल्यामुळे प्रसुतीच्या दरम्यान महिलेला आराम मिळतो, असं संशोधनातून समोर आलं आहे. अंथरुणावरुन पडून न राहता चालत्या-फिरत्या राहणाऱ्या महिलांना प्रसुतीच्या काळात आराम मिळतो, असंही संशोधनातून सिद्ध झालं आहे.

डॉ. फर्नेंडो यांच्या डान्सच्या स्टेप्स अत्यंत सोप्या असतात. त्यामध्ये सोप्या व्यायामप्रकारांचा समावेश आहे.

पाहा व्हिडिओ :विश्व शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: doctor fernando helps women through labor by dancing to reduce pain latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV