अमेरिकेमध्ये भारतीय इंजिनिअरच्या हत्येवर राष्ट्राध्यक्ष ट्रम्प म्हणाले...

By: | Last Updated: > Wednesday, 1 March 2017 11:08 AM
Donald trump first on Kansas Indian engineers murder

वॉशिंग्टन : अमेरिकेमध्ये भारतीय इंजिनिअरच्या हत्येवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अखेर आपलं मौन सोडलं आहे. अमेरिकेच्या संसदेत अमेरिकन काँग्रेसला संबोधित करताना, वर्णद्वेषातून होणाऱ्या कोणत्याही हल्ल्यांविरोधात अमेरिकेने एकत्रित येण्याची गरज असल्याचं मत डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केलं. यावेळी अमेरिकन काँग्रेसच्यावतीने केंसासमध्ये झालेल्या हत्येप्रकरणी एक मिनिटाचं मौन पाळून श्रद्धांजलीही वाहण्यात आली.

यापूर्वीही व्हाईट हाऊसच्या वतीने प्रसिद्ध पत्रक जाहीर केलं होतं. यात ट्रम्प यांनी भारतीय इंजिनिअर श्रीनिवास यांच्या हत्येवर शोक व्यक्त केल्याचं सांगितलं होतं. तसेच यावेळी त्यांनी वर्णभेदाची कठोर शब्दात निंदाही केली होती. शिवाय वर्णद्वेषाला देशात थारा नसल्याचं यावेळी स्पष्ट केलं होतं.

गेल्या बुधवारी हैदराबादचे इंजिनिअर श्रीनिवास यांना वर्णद्वेषातून गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या हल्ल्यात एक भारतीय आणि एक अमेरिकन नागरिकही जखमी झाला होता.

या घटनेतील हल्लेखोर हा अमेरिकेच्या नौदलाचा माजी कर्मचारी असल्याचं समोर आलं होतं. पोलिसांना दिलेल्या जबाबात या हल्लेखोरानं श्रीनिवासला मध्य-पूर्वेमधील देशांचा नागरिक समजून त्याच्यावर गोळ्या झाडल्याचं कबुल केलं. तसेच या हल्ल्यावेळी गोळ्या झाडल्यानंतर हल्लेखोरानं ‘माझ्या देशातून चालते व्हा!’ असंही म्हणलं होतं.

संबंधित बातम्या : ‘माझ्या देशातून चालता हो,’ अमेरिकेत भारतीय इंजिनिअरची हत्या

First Published:

Related Stories

'चना' आणि 'चना डाळ' शब्दांचा ऑक्सफर्ड डिक्शनरीत समावेश
'चना' आणि 'चना डाळ' शब्दांचा ऑक्सफर्ड डिक्शनरीत समावेश

लंडन : डाळ आणि ‘चना डाळ’ हा भारतीयांच्या जेवणात सर्रास वापरण्यात

युरोपमध्ये पुन्हा सायबर हल्ला, भारतालाही धोका
युरोपमध्ये पुन्हा सायबर हल्ला, भारतालाही धोका

मुंबई : वॉनाक्रायच्या दहशतीच्या महिन्याभरानंतर नव्या पीटरॅप

पासपोर्टचे रंग बदलले म्हणून रक्ताची नाती मिटत नाहीत : मोदी
पासपोर्टचे रंग बदलले म्हणून रक्ताची नाती मिटत नाहीत : मोदी

हेग : पासपोर्टचे रंग बदलले म्हणून रक्ताची नाती मिटत नाहीत, असे म्हणत

भारताकडे ग्लोबल इकॉनॉमिक पॉवर, नेदरलँडच्या पंतप्रधानांकडून मोदींचं स्वागत
भारताकडे ग्लोबल इकॉनॉमिक पॉवर, नेदरलँडच्या पंतप्रधानांकडून...

अॅमस्टरडॅम : अमेरिका दौऱ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी थेट

सय्यद सलाउद्दीन आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित, पाकिस्तानचा तिळपापड
सय्यद सलाउद्दीन आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित, पाकिस्तानचा...

नवी दिल्ली : दहशतवादाच्या मुद्द्यावर पाकिस्तानच्या कुरापती चालूच

पंतप्रधान मोदी अमेरिकेहून थेट नेदरलँडला रवाना
पंतप्रधान मोदी अमेरिकेहून थेट नेदरलँडला रवाना

वॉशिंग्टन : दोन दिवसीय अमेरिकेच्या दौऱ्यानंतर भारताचे पंतप्रधान

मिसेस मोदींसाठी व्हाईट हाऊसच्या गार्ड्सनी दरवाजे उघडले?
मिसेस मोदींसाठी व्हाईट हाऊसच्या गार्ड्सनी दरवाजे उघडले?

वॉशिंग्टन : जगातील दोन शक्तिशाली देशांच्या प्रमुख नेत्यांची

... तर भारताला अमेरिकेशी जवळीक महागात पडेल, चीनची धमकी
... तर भारताला अमेरिकेशी जवळीक महागात पडेल, चीनची धमकी

नवी दिल्ली : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे

इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खोमेनींनी ओकली काश्मीरविरोधी गरळ
इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खोमेनींनी ओकली काश्मीरविरोधी गरळ

तेहरान : इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खोमेनी यांनी ईदच्या दिवशी

मोदी भेटीदरम्यान मेलानिया यांनी परिधान केलेल्या ड्रेसची किंमत तब्बल...
मोदी भेटीदरम्यान मेलानिया यांनी परिधान केलेल्या ड्रेसची किंमत...

वॉशिंग्टन : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमेरिका आणि