ट्रम्प DSD योजना रद्द करणार, 7000 भारतीय वंशाच्या नागरिकांवर टांगती तलवार

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प डेफर्ड अॅक्शन फॉर चिल्ड्रन अरायव्हल (DSD) योजना रद्द करण्याच्या तयारीत आहेत. मंगळवारी यासंदर्भातील घोषणा होण्याची शक्यता आहे. ट्रम्प यांच्या या निर्णयामुळे भारतीय वंशाच्या जवळपास सात हजार अमेरिकन नागरिकांवर प्रत्यर्पणाची टांगती तलवार लटकत आहे.

By: | Last Updated: > Monday, 4 September 2017 11:11 PM
Donald Trump has decided to end DACA Scheme latest update

फाईल फोटो

वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प डेफर्ड अॅक्शन फॉर चिल्ड्रन अरायव्हल (DSD) योजना रद्द करण्याच्या तयारीत आहेत. मंगळवारी यासंदर्भातील घोषणा होण्याची शक्यता आहे. ट्रम्प यांच्या या निर्णयामुळे भारतीय वंशाच्या जवळपास सात हजार अमेरिकन नागरिकांवर प्रत्यर्पणाची टांगती तलवार लटकत आहे.

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी अवैधरितीने अमेरिकेत दाखल झालेल्या मुलांना प्रत्यर्पणपासून बचाव करण्यासाठी DSD योजना सुरु केली होती. अमेरिकेच्या ‘पॉलिटिको’ या वृत्तपत्राने ट्रम्प यांनी ही योजना रद्द केल्याचा दावा केला आहे.

तर ‘न्यूयॉर्क टाईम्स’च्या मते, प्रवासी कार्यक्रम रद्द करण्यापूर्वी राष्ट्राध्यक्षांनी काँग्रेसला (अमेरिकेच्या संसद) सहा महिन्याचा कालावधी दिला होता. या काळात यासंदर्भात नवीन नियम आणि कायदे केले जावेत, यासाठी हा वेळ देण्यात आला होता. कारण, डीएसडीअंतर्गत जवळपास 8 लाख लोकांना प्रत्यर्पणापासून सुरक्षा बहाल करतं.

दरम्यान, प्रतिनिधी सभेचे अध्यक्ष आणि सत्तारुढ रिपब्लिकन पक्षाचे वरिष्ठ नेते पॉल रेयॉन यांनी एका मुलाखतीत सांगितलं की, ”ट्रम्प यांनी डीएसडी योजना रद्द करण्याचा निर्णय घेऊ नये. कारण, या योजनेचा लाभ मिळवणारी मुलं अमेरिका सोडून इतर देशात जाऊ शकत नाहीत. त्यामुळे माझ्या मते, ते असं करणार नाहीत. हा एक असा मुद्दा आहे, ज्यावर काँग्रेसने गांभीर्यानं विचार केला पाहिजे.”

दुसरीकडे डेमोक्रॅटिक पक्षाने ट्रम्प यांच्या वर्णद्वेषावर टीका केली आहे. देशभक्त आणि धाडसी तरुणांना प्रत्यर्पणाची सक्ती करणं देश आणि अर्थव्यवस्थेसाठी घातक असल्याचं डेमोक्रॅटिक पक्षानं म्हटलं आहे.

विशेष म्हणजे, अॅप्पलचे मुख्य कार्यकारी अधिकारी टिम कुक यांनी डीएसडीसंदर्भातील ट्रम्प यांच्या भूमिकेवरुन टीका केली आहे. त्यांनी ट्वीट करुन, ”अॅप्पलचे 250 कर्मचारी ड्रीमर्स आहेत. मी त्यांच्या सोबत आहे. ते सर्व समान हक्काचे अधिकारी आहेत. या समस्येवर अमेकिरेच्या मुल्यांच्या आधारेच तोडगा निघाला पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.”

तर मायक्रोसॉफ्टचे सीईओ आणि भारतीय वंशाचे सत्या नाडेला यांनीही ट्रम्प यांच्या भूमिकेची आलोचना केली आहे. एका अधिकृत आकडेवारीनुसार, डीएसडी योजना रद्द केल्यास अमेरिकन अर्थव्यवस्थेला तब्बल 200 अब्ज डॉलर (तब्बल 13 लाख कोटी रुपये) नुकसान सोसावं लागू शकतं.

World News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:Donald Trump has decided to end DACA Scheme latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

अमेरिकेने हल्ला केल्यास उत्तर कोरियाचं काय होईल?
अमेरिकेने हल्ला केल्यास उत्तर...

मुंबई : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी उत्तर

मेक्सिकोमध्ये 7.1 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप, आतापर्यंत 248 जणांचा मृत्यू
मेक्सिकोमध्ये 7.1 रिश्टर स्केल...

मेक्सिको : मेक्सिकोची राजधानी मेक्सिको सिटीमध्ये 7.1 रिश्टर स्केल

... तर उत्तर कोरियाला पूर्णपणे उद्ध्वस्त करु, ट्रम्प यांचा थेट इशारा
... तर उत्तर कोरियाला पूर्णपणे...

न्यूयॉर्क : संयुक्त राष्ट्र संघाच्या महासभेत पहिल्यांदाच बोलताना

रोहिंग्या मुस्लिमांच्या विस्थापनावरुन म्यानमारच्या आँग सान सू क्यींनी मौन सोडलं
रोहिंग्या मुस्लिमांच्या...

यंगून : रोहिंग्या मुस्लिमांना देशातून विस्थापित व्हावं

अमेरिकेकडून उत्तर कोरियाच्या आकाशात मॉक ड्रिल
अमेरिकेकडून उत्तर कोरियाच्या आकाशात...

प्याँगयांग (उत्तर कोरिया) : जगाची डोकेदुखी बनलेल्या उत्तर कोरियाचा

उत्तर-दक्षिण कोरियाच्या वादात चीन, रशिया आणि जपानला एवढा रस का?
उत्तर-दक्षिण कोरियाच्या वादात चीन,...

मुंबई : जगभरासाठी डोकेदुखी ठरलेल्या उत्तर कोरियाला अमेरिकेने

पाकिस्तान : हाफिज सईदची संघटना 2018 ची निवडणूक लढवणार
पाकिस्तान : हाफिज सईदची संघटना 2018 ची...

लाहोर : मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईदची

व्हाईट हाऊसबाहेरील गवत कापण्याचं काम 11 वर्षीय चिमुकल्याकडे
व्हाईट हाऊसबाहेरील गवत कापण्याचं...

वॉशिंग्टन : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचं निवासस्थान असलेल्या

20 वर्षांच्या प्रदीर्घ प्रवासानंतर नासाचं 'कॅसिनी' यान शनी ग्रहाजवळ नष्ट
20 वर्षांच्या प्रदीर्घ प्रवासानंतर...

वॉशिंग्टन : अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नॅशनल एरोनॉटिक्स अॅण्ड

जगासाठी डोकेदुखी ठरलेल्या उत्तर कोरियाचं भारत कनेक्शन!
जगासाठी डोकेदुखी ठरलेल्या उत्तर...

नवी दिल्ली : उत्तर कोरियाचा हुकूमशाह किम जोंग उनने पुन्हा एकदा